मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अतिशय विचित्र आजाराने ग्रस्त आहे हा तरुण; सहा महिन्यात गमावल्या 4 नोकऱ्या

अतिशय विचित्र आजाराने ग्रस्त आहे हा तरुण; सहा महिन्यात गमावल्या 4 नोकऱ्या

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या व्यक्तीला असलेल्या विचित्र आजारामुळे त्याला गेल्या सहा महिन्यांत तब्बल चार नोकऱ्या (Man lost 4 jobs in 6 months) गमवाव्या लागल्या आहेत

नवी दिल्ली 16 एप्रिल : जगात कित्येक लोकांना विविध प्रकारचे आजार असतात. यातील काही आजार एवढे विचित्र असतात, की त्यांना इतरांप्रमाणे नॉर्मल आयुष्य (Weird diseases in world) जगता येत नाही. असाच काही प्रकार ब्रिटनमधील एका व्यक्तीसोबत होतो आहे. या व्यक्तीला असलेल्या विचित्र आजारामुळे त्याला गेल्या सहा महिन्यांत तब्बल चार नोकऱ्या (Man lost 4 jobs in 6 months) गमवाव्या लागल्या आहेत. काय आहे हा आजार, ज्यामुळे तो नोकरीच्या ठिकाणी टिकू शकत नाही? जाणून घेऊया. पाणी पित असताना बाटलीचं झाकणच घशात अडकलं; 9 वर्षीय विद्यार्थ्यासोबत पुढे काय घडलं पाहा, VIDEO रायन लुईस (Ryan Lewis) असं या व्यक्तीचं नाव आहे. तो ब्रिटनमधील शेफिल्ड (Sheffield) गावात राहतो. त्याने सांगितलं की, गेल्या सहा महिन्यांत त्याला चार नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. याला कारण म्हणजे, त्याला असलेला विचित्र आजार. त्याला ‘सायक्लिकल वोमिटिंग सिंड्रोम’ (Cyclical Vomiting Syndrome) हा दुर्मिळ आजार झाला आहे. मेंदू आणि आतड्याला जोडणाऱ्या पेशींमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे हा आजार (Rare Vomiting disease) होतो. यामुळे त्याला दरतासाला तब्बल 10 वेळा उलटी (Britain man vomits 10 times in an hour) येते. यामुळेच तो कोणत्याही नोकरीच्या ठिकाणी टिकू शकला नाही. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आजाराचे इतरही परिणाम रायनने सांगितले की, या आजारामुळे त्याला संपूर्ण शरीरात अ‍ॅलर्जी होते. यामुळे तीव्र पोटदुखी जाणवून उलटी होते. या आजारामुळे रायनच्या पोटात अन्न तर दूर, अगदी पाणीदेखील टिकत नाही. त्याने काही खाल्ल्यास किंवा प्यायल्यास त्याला लगेच उलट्या (Britain man vomiting disease) येण्यास सुरुवात होते. यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात थकवा येतो. परिणामी, तो घरातून बाहेरही पडू शकत नाही. याचा परिणाम त्याच्या आयुष्यावर (Man loses 4 jobs due to rare disease) होतो आहे, मात्र तो याबाबत काहीच करू शकत नाही. पतीने चुकून पत्नीच्या विक्रीची दिली ऑनलाईन जाहिरात; खरेदीदारांनी केली हद्द पार, पाहून खुश झाली महिला सात वेळा दाखल झालाय रुग्णालयात अवघ्या 22 वर्षांच्या रायनला (Ryan Lewis rare disease) गेल्या सहा महिन्यांत सात वेळा रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे. अगदी त्याच्या वाढदिवसालाही तो रुग्णालयातच होता. त्यामुळे आपला 22वा वाढदिवसही त्याला साजरा करता आला नाही. सध्या तरी या आजारावर पूर्णपणे प्रभावी असे औषध किंवा उपचार पद्धती उपलब्ध नाही. मात्र, डॉक्टर पूर्ण मेहनतीने रायनवर उपचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे लवकरच आपण या आजारातून मुक्त होऊ अशी आशा रायनला आहे.
First published:

Tags: Rare disease, Serious diseases

पुढील बातम्या