मराठी बातम्या /बातम्या /Viral /नातीच्या लग्नात आजीबाई जोमात, डान्सिंग फ्लोअरवर दाखवला आपला जलवा; पाहा VIDEO

नातीच्या लग्नात आजीबाई जोमात, डान्सिंग फ्लोअरवर दाखवला आपला जलवा; पाहा VIDEO

नवरीबाईच्या आजीचा डान्स पाहून तरुणीही थक्क झाल्या.

नवरीबाईच्या आजीचा डान्स पाहून तरुणीही थक्क झाल्या.

नवरीबाईच्या आजीचा डान्स पाहून तरुणीही थक्क झाल्या.

मुंबई, 27 सप्टेंबर : लग्न (Wedding video) म्हणजे त्यात धम्माल मस्ती, डान्स (Wedding dance video)  आलंच. लग्नातील डान्सचे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. कधी नवरदेवाने (Groom dance vide0) नवरीसाठी डान्स केला, कधी नवरीने (Bride dance video) नवरदेवासाठी डान्स केला, कधी दोघांनीही एकत्र रोमँटिक डान्स केला (Groom and bride dance video). तर कधी वहिनी-दिर (Sister in law and borther in law video), मेहुणी-भावोजी (Jija saali video) यांची डान्सिंग जोडीही हिट ठरली आहे. पण आता मात्र या सर्वांना मागे टाकलं आहे नवरीबाईच्या आजीने (Bride grandmother dance video). आपल्या नातीच्या लग्नात आजीने आपला जलवा दाखवला आहे.

ज्याप्रमाणे आपल्या मुलीच्या लग्नाचा आनंद तिच्या आईबाबांना असतो, तितकाच आनंद आपल्या नातीच्या लग्नाचा आजी-आजोबांनाही असतो. आपल्या नातीच्या लग्नात कसली कमतरता राहू नये, यासाठी आजी-आजोबाही धडपडत असतात. या आजींनी तर अगदी लग्नातील मनोरंजनातही कसर सोडली नाही. त्या स्वतः डान्स फ्लोअरवर उतरल्या.

व्हिडीओत पाहू शकता एक आजी डान्सिंग फ्लोअरवर आहे. तिच्या आजूबाजूला बऱ्याच तरुणी आहेत. आजी या तरुणींमध्ये आपला जलवा दाखवता दिसते.खंबे जैसी खडी है, लडकी है या छडी है या गाण्यावर आजी आपला स्वॅग दाखवते आहे.

हे वाचा - आजी अन् नातवानं धरला गाण्यावर ठेका; व्हायरल होतोय भन्नाट डान्स VIDEO

वयामुळे आजीला अगदी जोशात नाचणं शक्य नाही. पण तिला जितकं जमतं आहे, तितकी हालचाल ती करते आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणे गाण्याप्रमाणे एक्स्प्रेशन देताना ती दिसते. भले तिने भारी ठुमके लगावले नाही पण तिच्या हावभावांनी, तिच्या अॅटीट्युडने मात्र तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ज्यामध्ये तर तिच्या आजूबाजूच्या तरुणीही तिला टक्कर देऊ शकत नाही आहेत. त्यासुद्धा आजीला पाहून थक्क झाल्या आहेत. आजीकडे टकामका पाहताना दिसत आहेत.

हे वाचा - डान्सिंग टॅलेंट दाखवणाऱ्या तरुणासोबत घडलं भलतंच काही; VIDEO पाहून पोट धरून हसाल

ब्राइड्स स्पेशन इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नातीच्या लग्न एन्जॉय करणारी, डान्स करणारी ही आजी सर्वांना आवडली आहे. या आजीला पाहताच बॉस दादी, कूल दादी अशीच प्रतिक्रिया आपल्याही तोंडातून येते.

First published:

Tags: Viral, Viral videos, Wedding video