मराठी बातम्या /बातम्या /Viral /

तुम्हाला पायही ठेवावासा वाटणार नाही, अशा ठिकाणी नवरीबाईने हौशीने केलं फोटोशूट; पाहा VIDEO

तुम्हाला पायही ठेवावासा वाटणार नाही, अशा ठिकाणी नवरीबाईने हौशीने केलं फोटोशूट; पाहा VIDEO

नवरीबाईने वेडिंग फोटोशूटसाठी निवडलं असं ठिकाण.

नवरीबाईने वेडिंग फोटोशूटसाठी निवडलं असं ठिकाण.

नवरीबाईने अशा ठिकाणी फोटोशूट केलं की सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे हा व्हिडीओ.

  • Published by:  Priya Lad
तिरुवनंतपुरम, 21 सप्टेंबर : लग्न म्हटलं की फोटोशूट आलंच. आपल्या लग्नाचे अविस्मरणीय क्षण जपून ठेवण्यासाठी नवरा-नवरी वेडिंग फोटोशूट करून घेतात. सध्या फक्त लग्नादिवशीच नव्हे तर लग्नाआधी आणि लग्नानंतर प्री-वेडिंग, पोस्ट-वेडिंग असेही फोटोशूट केले जातात. यासाठी समुद्र, नदीकिनारा, डोंगर, गार्डन, टुरिस्ट स्पॉट, रोमँटिक ठिकाणं निवडली जातात. पण एका नवरीबाईने आपल्या फोटोशूटसाठी असं ठिकाण निवडलं आहे, जिथं फोटो काढणं दूर तुमची पाय ठेवण्याचीही इच्छा होणार नाही. वेडिंग फोटोशूट युनिक असावं यासाठी काही ना काही हटके आयडिया काढल्या जातात. या नवरीबाईने जी आयडिया शोधली त्याचा तुम्ही ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार करणार नाही. वेडिंग फोटोशूटचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता नवरीबाई साडी नेसून, नटूनथटून उभी दिसते आहे. रस्त्यावर ती फोटोशूट करण्यासाठी उभी आहे. आता रोडवर फोटोशूट करणं तसं काही नवं नाही. पण हा रोड असा आहे, ज्यावर तुमची पाय ठेवण्याचीही इच्छा होणार नाही. ज्या रस्त्यावरून चालणंही नकोसं वाटतं, त्याच रस्त्यावर या नवरीबाईने अगदी हौशेने, हसत-आनंदात फोटोशूट केलं आहे. हे वाचा - म्हणे, 'कृपा करून...'; बड्या उद्योगपतीने शेअर केलेली Matrimonial Ad सोशल मीडियावर तुफान Viral व्हिडीओ पाहाल तर हा रस्ता एरवी सुंदर फोटोशूटसाठी वापरावा तसा तुळतुळीत नाहीच. पण याला रस्ता म्हणावं का असाच प्रश्न पडतो. कारण रस्ता कमी आणि खड्डेच जास्त दिसत आहेत. ज्यामध्ये ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे. रस्ता जणू गायबच झाला आहे. पण तरी ही नवरीबाई या खड्डेमय रस्त्यातून मार्ग काढत चालताना दिसते आहे. तिच्या आजूबाजूला बऱ्याच गाड्याही जात आहेत. त्यामुळे चालताना अंगावर चिखल उडण्याची, चिखल असलेल्या या रस्त्यात घसरून खड्ड्यात पडण्याची भीतीही तिला आहेच. त्यामुळे अंगावर चिखल उडणार नाही किंवा खड्ड्यातील चिखलात पाय पडणार नाही, त्याची काळजी घेत अगदी हळूहळू पावलं टाकते आहे.
@arrow_weddingcompany इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ केरळमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. हे वाचा - प्रेम काय असतं...; महिला IAS अधिकाऱ्याने शेअर केलेला Romantic video तुफान व्हायरल रस्त्यावरील खड्ड्यांच्या स्थितीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न नवरीबाईने केला. कदाचित ती करण्यात यशस्वीही झाली. तुम्हाला ही फोटोशूटची आयडिया कशी वाटली ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
First published:

Tags: Marriage, Photoshoot, Viral, Viral photoshoot, Viral videos, Wedding, Wedding video

पुढील बातम्या