मुंबई, 18 सप्टेंबर : IAS-IPS अधिकारी म्हटलं की एक अभ्यासू, शिस्तप्रिय, कठोर अशी व्यक्ती समोर येते. असे अधिकारी त्यांच्या जबरदस्त कामगिरीसाठी आणि धडाकेबाज निर्णयासाठी प्रसिद्ध असतात. पण सध्या एका महिला आयएएस अधिकाऱ्याने आपल्या वेगळ्याच गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो तुफान व्हायरल होतो आहे. महिला आयएएस अधिकाऱ्याने आपल्या सोशल मीडियावर प्रेमाचा एक रोमँटिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. खरं प्रेम म्हणजे काय असतं, हे दाखवण्याचा प्रयत्न या अधिकाऱ्याने केला. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला. डॉ. सुमिता मिश्रा असं या आयएएस अधिकाऱ्याचं नाव. डॉ. मिश्रा या हरयाणातील अॅग्रीकल्चर आणि फार्मर्स वेल्फेअरच्या अॅडिशनल चीफ सेक्रेटरी आणि हरयाणा पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या चेअरमन आहेत. हे वाचा - शाळकरी मुलाच्या ‘चंद्रा’नं अख्ख्या महाराष्ट्राला लावलंय वेड, सूर असा की अंगावर येतील शहारे, पाहा Video त्यांनी त्यांच्या ट्विटरवर पोस्ट केलेला व्हिडीओ तुम्ही पाहिला तर त्यात तुम्हाला एक वृद्ध दाम्पत्य दिसेल. व्हिडीओत पोस्ट दोघंही एकमेकांसमोर जमिनीवर बसले आहेत. आपल्या थरथरत्या हातांनी महिला आपल्या नवऱ्याला जेवण भरवते आहे. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘एक प्यार का नगमा है’ गाणं ऐकू येतं आहे.
कोई पूछे कि प्यार क्या होता है तो बता देना प्यार इस उम्र में और यह होता है॥ pic.twitter.com/gOgFaqfJqp
— Dr Sumita Misra IAS (@sumitamisra) September 18, 2022
“कुणी विचारलं की प्रेम काय असतं तर बस्सं या वयात आणि असं असतं हे सांगा”, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. हे वाचा - एका बॉयफ्रेंडसाठी 2 गर्लफ्रेंडचा राडा! एकमेकींच्या जीवावर उठल्या; काय झाला शेवट पाहा VIDEO आयएएस अधिकाऱ्याने शेअर केलेला हा प्रेमाचा व्हिडीओ पाहून नेटिझन्स भावुक झाले आहेत. वृद्ध दाम्पत्यातील हे असं प्रेम अनेकांना भावलं आहे. हेच खरं प्रेम आहे, याच्याशी अनेकजण सहमत झाले आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.