लखनऊ 28 जून : लग्नाचा दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा आणि खास दिवस असतो. मात्र कधीकधी लग्नाच्या दिवशीच अशा काही घटना घडतात, ज्या सगळ्यांनाच हादरवून सोडतात. अशीच एक घटना आता उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. फिरोजाबादमध्ये एकाच घरी दोन वेगवेगळ्या नवरदेवांच्या वराती आल्या. कारण या घरातील दोन मुलींची लग्न एकसोबतच केली जाणार होती. मात्र ऐनवेळी या लग्नात भलताच ट्विस्ट आला सोमवारी या दोन्ही वराती घरी आल्या असताना एक नवरदेवाच्या घरच्यांचं वधूकडील लोकांसोबत भांडण झालं. वाद इतका वाढला की मंडपातच हाणामारीही झाली. हे पाहून नवरीने लग्नास नकार दिला. यानंतर एका वरातीला नवरीला न घेताच परतावं लागलं. प्रकरण बायपास रोडचं आहे. यात राधेश्याम राजपूत यांनी आपल्या दोन्ही मुलींचं लग्न एकत्र निश्चित केलं. सोमवारी रात्री दोन्ही नवरदेवांच्या वराती लग्नस्थळी पोहोचल्या. एक वरात धर्मेंद्र कुमार यांचा मुलगा उदयवीर राजपूतची होती, जी साईपूर गावातून आली होती. तर दुसरी नगला इम्लिया येथून आली होती. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीसाठी मिठाई आणायला गेला पती; पत्नी पूर्ण रात्र वाट बघत राहिली पण झालं मोठं कांड दोघांचा वरमालेचा कार्यक्रमही झाला. दरम्यान, साईपूरहून आलेल्या नवरदेवाकडी बाजू आणि वधूची बाजू यांच्यात डान्सवरुन काहीतरी वाद झाला. हा वाद इतका वाढला की दोन्ही पक्ष एकमेकांशी भांडू लागले. हे सगळं पाहून वधूने लग्न करण्यास नकार दिला. वधूने सांगितलं की, वराच्या बाजूच्या लोकांनी तिच्या घरच्यांवर हल्ला केला, ज्यामध्ये दोन जण जखमीही झाले. आता ती या वराशी लग्न करणार नाही. हा गोंधळ पाहून पोलिसांना माहिती देण्यात आली. जसराना पोलीस ठाण्याचे अध्यक्ष सचिन कुमार यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही पक्षाच्या लोकांना पोलीस ठाण्यात आणलं. वधूची समजूत घालून विवाह संपन्न व्हावा यासाठी ग्रामस्थ आणि दोन्ही पक्षांची पंचायत मंगळवारी सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात सुरू होती. पण वधू पक्ष आणि तिचे कुटुंबीय कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलीचं या मुलासोबत लग्न लावायला तयार नव्हते. यानंतर साईपूरहून आलेली वरात नवरीशिवायच परतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.