जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'कधीच शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत आणि...'; पाठवणीवेळी नवरीच्या 3 विचित्र अटी, काही तासातच तुटलं लग्न

'कधीच शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत आणि...'; पाठवणीवेळी नवरीच्या 3 विचित्र अटी, काही तासातच तुटलं लग्न

पाठवणीवेळी नवरीच्या विचित्र अटी (प्रतिकात्मक फोटो)

पाठवणीवेळी नवरीच्या विचित्र अटी (प्रतिकात्मक फोटो)

वधूच्या वडिलांनी वर आणि त्याच्या वडिलांसमोर तीन अटी ठेवल्या होत्या. यामध्ये पहिली अट होती की वधू-वरामध्ये शारीरिक संबंध असणार नाहीत.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ 09 जून : उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात लग्नाशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे, पाठवणीच्या वेळी वधूच्या वडिलांनी वर आणि त्याच्या कुटुंबियांसमोर अशा 3 अटी ठेवल्या, ज्या ऐकून सगळेच हादरले. त्यात एक अट अशी होती की वधू आणि वर कधीच शारीरिक संबंध ठेवणार नाहीत. झाशी जिल्ह्यातील बरुआसागर पोलीस स्टेशन हद्दीतील सिनौरा येथील रहिवासी असलेल्या मानवेंद्रचं लग्न गुरसारे येथे राहणाऱ्या मुलीसोबत निश्चित झालं होतं. 6 जून रोजी वरात निघणार होती. त्यामुळे मानवेंद्र यांच्या घरी आनंदाचं वातावरण होतं. तो दिवसही आला, ज्याची घरातील सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. वधू वडील आणि बहिणीसह बारूसागर येथील विवाह मंडपात पोहोचली. ढोलताशांसह वरात लग्नमंडपातही पोहोचली. टिका, जयमाला, सात फेरे असे सर्व विधी येथे पार पडले. यानंतर पाठवणीची वेळ आली. नवरदेवाकडील लोक नवरीला सासरी घेऊन जाण्याची तयार करत असतानाच अचानक नवरीने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. . Weird Tradition - सासरी जाणाऱ्या लेकीच्या छातीवर थुंकतो बाप; इथं लग्नानंतर विचित्र पद्धतीने होते मुलीची पाठवणी याचं कारण म्हणजे वधूच्या वडिलांनी वर आणि त्याच्या वडिलांसमोर तीन अटी ठेवल्या होत्या. यामध्ये पहिली अट होती की वधू-वरामध्ये शारीरिक संबंध असणार नाहीत. दुसरी अट अशी होती की वधूने तिच्या धाकट्या बहिणीला तिच्या सासरच्या घरी नेलं पाहिजे. तिसरी अट अशी होती, की वडील कधीही सासरच्या घरी जाऊ शकतील आणि त्यांना कोणी अडवणार नाही. या तीन अटी वराच्या वडिलांनी आणि वराने स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर नववधूला राग आला आणि ती डोलीत बसून सासरच्या घरी जाण्याऐवजी गुरसरे येथील वडिलांच्या घरी गेली. लग्न मोडल्यानंतर नवरदेवाने सांगितलं, की 6 तारखेला त्याचं लग्न झालं होतं. सर्व विधी झाल्यानंतर मुलगी खोलीत गेली. यानंतर तिचे वडील आले आणि त्यांनी तीन अटी सांगितल्या. तिन्ही अटींना नकार दिल्यानंतर वधू वडिलांच्या घरी गेली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात