नवी दिल्ली 12 जून : आजकाल बहुतेक लोक रिल बनवण्याच्या नादात वाहतूक नियमांचं उल्लंघन करताना दिसतात. काहीजण गजबजलेल्या रस्त्यावर नाचताना दिसतात तर काही बाईकवर स्टंट करताना दिसतात. याआधीही अशी अनेक प्रकरणं पाहण्यात आली आहेत, जेव्हा पोलिसांनी रिलसाठी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांना अद्दल घडवली. आता ट्रॅफिक नियमांच्या उल्लंघनाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक नवरीबाई स्कूटी चालवताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ती तरुणी वधूच्या पोशाखात वर्दळीच्या रस्त्यावर स्कूटी चालवत असल्याचं दिसून येतं. समोर वाहनावर बसलेली व्यक्ती तिचा व्हिडिओ बनवत आहे. ‘हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’ चित्रपटातील ‘सजना जी वारी वारी’ या गाण्यावर ही तरुणी व्हिडिओ रील बनवत होती. त्यानंतर पोलिसांनी तिला पकडलं. हायवेवर धावताना कारचा चुकून रिवर्स गेअर पडला तर? तुमच्याही मनात येतो का असा प्रश्न? तिने हेल्मेट घातलं नव्हतं आणि तिच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नव्हतं, असा पोलिसांचा आरोप आहे. या कारणास्तव तिचं 6000 चे चलन कापण्यात आलं आहे. हेल्मेट न घातल्याबद्दल 1000 रुपये आणि ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याबद्दल 5000 रुपयांचं चलन कापण्यात आलं आहे.
हा व्हिडिओ दिल्ली पोलिसांच्या अधिकृत अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. पोलीस म्हणाले, ‘रस्त्यावर रील बनवणं मूर्खपणाचं आहे. काही लाईक्ससाठी जीव धोक्यात घालणं मूर्खपणाचे आहे’. पोलीस पुढे म्हणाले, ‘कृपया रस्त्यावर अशा गोष्टी करू नका’. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईचं यूजर्सनी कौतुक केलं आहे. एका यूजरने लिहिलं, ‘ग्रेट जॉब दिल्ली पोलीस’. तर दुसर्या यूजरने लिहिलं की, ‘हे खूप चांगलं आहे की दिल्ली पोलीस स्वतःहून दखल घेत आहेत’.