जाहिरात
मराठी बातम्या / Viral / लग्न लेकाचं आणि हवा वडिलांची; जबरदस्त डान्सने वाढवला इंटरनेटचा पारा, पाहा Video

लग्न लेकाचं आणि हवा वडिलांची; जबरदस्त डान्सने वाढवला इंटरनेटचा पारा, पाहा Video

व्हायरल

व्हायरल

लग्न म्हटलं की धमाल मस्ती, विधी परंपरा अशा अनेक गोष्टी एकत्र येतात. लग्नांचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड करताना पहायला मिळतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 14 जानेवारी : लग्न म्हटलं की धमाल मस्ती, विधी परंपरा अशा अनेक गोष्टी एकत्र येतात. लग्नांचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड करताना पहायला मिळतात. त्यामुळे अनेक मजेशीर, भावुक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हायरल व्हिडीओमुळे कोण कधी चर्चेत येईल काही सांगता येत नाही. सध्या आणखी एका लग्नातील व्हिडीओ प्रेक्षकांचं लक्ष वेधत असून चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या लग्नाच्या व्हिडीओमध्ये नवरदेवापेक्षा त्याच्या वडिलांचीच हवा पहायला मिळत आहे. नवरदेवाच्या वडिलांनी सध्या इंटरनेटचा पारा वाढवला असून सगळ्यांची मनं जिंकली आहेत. व्हिडीओमध्ये दिसतंय की, नवरदेवाचे वडिल अभिनेता रणबीर कपूरच्या ये जवानी है दिवानी या चित्रपटातील बद्तमीज दिल या गाण्यावर डान्स करत आहे. त्यांचा हटके आणि जबरदस्त डान्स पाहून तुम्हीही त्यांचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. लेकाच्या लग्नात बापाची हवा पाहून अनेकजण त्यांना कूल डॅड असल्याचं म्हणत आहेत.

जाहिरात

हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून व्हिडीओवर भरभरुन लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. नवऱ्या मुलाच्या वडिलांची जबरदस्त एनर्जी पाहून भलेभले तरुणही लाजतील. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधत आहे. Sarthak Aastha नावाच्या अकांऊंटवरुन हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, लग्नातील असे अनेक हटके आणि मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यापहिलेही लग्नातील बरेच डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सध्याचा व्हिडीओला नेटकरी पसंती दर्शवत आहेत. व्हिडीला आत्तापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात