जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 7 फेऱ्यानंतर 7 दिवसातच नवरीने तोडलं 7 जन्माचं नातं; पतीसोबत चित्रपट पाहायला गेली, इंटरव्हलमध्येच मोठं कांड

7 फेऱ्यानंतर 7 दिवसातच नवरीने तोडलं 7 जन्माचं नातं; पतीसोबत चित्रपट पाहायला गेली, इंटरव्हलमध्येच मोठं कांड

थिएटरमधूनच नवरी फरार (प्रतिकात्मक फोटो)

थिएटरमधूनच नवरी फरार (प्रतिकात्मक फोटो)

दोघंही थिएटरमध्ये चित्रपट पाहायला गेले होते. मध्यंतरानंतर पती खाण्यासाठी काहीतरी आणण्याकरता बाहेर गेला. मात्र परत आला तेव्हा त्याची पत्नी गायब होती.

  • -MIN READ Rajasthan
  • Last Updated :

जयपूर 05 जुलै : लग्नाचं नातं हे सात जन्माचं असतं, असं म्हणतात. मात्र अनेकदा अशाही घटना समोर येतात, ज्यात हे नातं अगदी सात दिवसही टिकत नाही. असंच एक अजब प्रकरण राजस्थानच्या जयपूरमधून समोर आलं आहे. इथे एक पती पोलिसांकडे आपली पत्नी हरवल्याची तक्रार करायला पोहोचला. त्याने सांगितलं की दोघंही थिएटरमध्ये चित्रपट पाहायला गेले होते. मध्यंतरानंतर तो खाण्यासाठी काहीतरी आणण्याकरता बाहेर गेला. मात्र परत आला तेव्हा त्याची पत्नी गायब होती. पोलीस विवाहितेचा शोध घेतच होते, मात्र त्याआधी ती स्वत: पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने सांगितलं की, ती या लग्नात खूश नव्हती. त्यामुळेच तिने पतीला सोडून थिएटरमधून पळ काढला. सीकरचा तरुण 3 जूनला म्हणजे लग्नानंतर 7 दिवसांनी आपल्या नवविवाहित वधूसोबत हनिमूनसाठी जयपूरला आला होता. इथे त्याने हॉटेलमध्ये रूम बुक केली. मग पिंक स्क्वेअर मॉलमध्ये बायकोसोबत सिनेमा पाहण्याचा प्लॅन बनवला. त्यांनी दुपारी 12 च्या शोसाठी तिकीट बुक केलं. त्यानंतर पती-पत्नी हातात हात घालून चित्रपट पाहायला गेले. चित्रपटाच्या मध्यंतरात दीड वाजताच्या सुमारास पती पत्नीसाठी काहीतरी खायला आणण्यासाठी गेला. तेव्हाच पत्नीने तिथून पळ काढला. पतीने परत येऊन पाहिलं असता त्याला धक्काच बसला. त्याची पत्नी तिथे नव्हती. त्याने आपल्या पत्नीचा थिएटर आणि मॉलमध्ये शोध घेतला. पण ती कुठेच सापडली नाही. त्याने पत्नीला अनेकदा फोन केला. पण फोन स्वीच ऑफ येत होता. अनुचित प्रकाराच्या भीतीने 33 वर्षीय पतीने पोलीस ठाणं गाठलं. लग्नाच्या दिवशी नवरदेवाने मंडप सोडून थेट पोलीस ठाणं गाठलं; नवरीविरोधातच केली तक्रार, प्रकरण काय? पतीने पोलिसांना संपूर्ण घटना सांगून पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आला. सिनेमा हॉलमधून पळून गेलेली नववधू काही तासांनंतर जयपूरमधील शाहपुरा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. जिथे तिने सांगितलं की ती या लग्नामुळे खूश नाही, त्यामुळे सिनेमा हॉलमध्ये संधी मिळताच तिने पतीला सोडून तिथून पळ काढला. यानंतर ती बसमध्ये बसून तिच्या माहेरी शाहपुरा येथे आली. वधू सापडल्यानंतर शाहपुरा पोलिसांनी आदर्शनगर पोलिसांना माहिती दिली. इकडे दोन्ही कुटुंबं वधूची समजूत घालण्यात व्यस्त आहेत. 7 फेऱ्यांनंतर 7 जन्म एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेणारं हे नातं अवघ्या 7 दिवसात तुटण्याच्या मार्गावर आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride , marriage
  • First Published :
जाहिरात
जाहिरात