लखनऊ 01 जून: काही वर्षांपूर्वी लग्नमंडपात येणारी नवरी लाजत नवरदेवासमोर उभा राहायची. मात्र, आता हे चित्र बदलताना दिसत आहे. आपल्याच लग्नात मनमोकळेपणानं डान्स (Dance) करणाऱ्या अनेक नवरीबाईंचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) होत असतात आणि या व्हिडिओला नेटकऱ्यांची तुफान पसंतीदेखील मिळते. मात्र, आता एका लग्नातील आगळावेगळा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये नवरीबाईनं आधी हवेत गोळीबार (Firing in Air) केला आणि यानंतर नवरदेवाला वरमाळा घातली. नवरीबाईनं केलेल्या या फायरिंगचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला.
उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्ये जेठवारा ठाण्यापासून तीन किलोमीटर दूर असलेल्या एका गावात लग्नसमारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी रात्री याठिकाणी नवरदेवाची वरात आली. लग्नासाठी अगदी आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. रात्री सुमारे अकरा वाजता नवरीबाई लग्नसमारंभासाठी घरातून बाहेर पडली. यानंतर नवरीबाई लग्नासाठी स्टेजवर चढत असतानाच तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं तिच्या हातात रिवॉल्वर दिली. यानंतर नवरीबाईनं स्टेजवर चढताच पहिल्यांदा हवेत गोळीबार केला आणि यानंतर तिनं नवरदेवाच्या गळ्यात वरमाळा घातली. नवरीबाईनं हवेत गोळीबार करताच उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला.
सात फेरे घेण्याआधी नवरीबाईनं केला हवेत गोळीबार pic.twitter.com/HOwqJ6OrYX
— News18Lokmat (@News18lokmat) June 1, 2021
या राज्यात 2-3 महिन्यांतच होतायेत नवविवाहितांचे घटस्फोट, सरकारनं उचललं मोठं पाऊल
हा विवाहसोबळा रविवारी रात्री पार पडला. तर, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच बुधवारी हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. नवरीबाईनं केलेला हवेतील गोळीबार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसओ जेठवारा संजय पांडे यांना याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, हे खरंच झालं असल्यास याप्रकरणी लायसन्स जप्त करण्याची कारवाई केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.