जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video: डान्स करताना नवरदेवाने इतकं फिरवलं की स्टेजवरच चक्कर येऊन पडली नवरी

Viral Video: डान्स करताना नवरदेवाने इतकं फिरवलं की स्टेजवरच चक्कर येऊन पडली नवरी

स्टेजवर चक्कर येऊन पडली नवरी

स्टेजवर चक्कर येऊन पडली नवरी

गाण्यावर वर नवरीला गोल फिरवू लागतो आणि वधूही फिरत राहाते. वधू इतकी उत्साही असते की या नादात आपण किती फेऱ्या मारल्या हेच तिला कळत नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 16 जुलै : सोशल मीडियावर अनेकदा काही ना काही मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत राहतात. पण यातील काही व्हिडिओच असे असतात की ते पाहून आपला दिवसच चांगला जातो. अनेकदा लग्नांमध्ये अशा काही घटना घडतात, ज्या सोशल मीडियावर अगदी लगेचच व्हायरल होतात आणि लोकांना हे व्हिडिओ पाहायलाही आवडतंही. आता पुन्हा एकदा लग्नाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पाहिला जात आहे. ज्यामध्ये वराने वधूसोबत असं काही केलं, की ती जमिनीवरच पडली. व्हिडिओमध्ये असं दिसून येतं की, वरमाला घातल्यानंतर वधू आणि वर ‘पद्मावत’ चित्रपटातील ‘घूमर घूमर’ गाण्यावर नाचू लागतात. या गाण्यावर वर नवरीला गोल फिरवू लागतो आणि वधूही फिरत राहाते. वधू इतकी उत्साही असते की या नादात आपण किती फेऱ्या मारल्या हेच तिला कळत नाही. मात्र जास्त फिरल्यामुळे तिला चक्कर येते आणि डान्स करत असतानाच ती जमिनीवर पडते. यातील धक्कादायक बाब म्हणजे ती खाली पडत असताना नवरदेव तिला पकडून पकडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्नही करत नाही आणि तिला तसंच पडू देतो.

जाहिरात

जेव्हा त्याने मदतीसाठी हात पुढे केला तोपर्यंत नववधू चक्कर येऊन जमिनीवर पडली होती. वधू पडल्यानंतरही वराने तिला उचलण्याचा प्रयत्न केला नाही आणि मागे सरकला. यानंतर कुटुंबातील एक महिला आली आणि तिला उचलून नेलं. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स विविध कमेंट करत आहेत. Mumbai News: मुलं आई-वडिलांचा फोटो काढत असतानाच डोळ्यादेखत आई समुद्रात वाहून गेली; मुंबईतील धक्कादायक घटना एका युजरने म्हटलं की, “नवरी पडल्यानंतरही नवरदेवाने तिला उचललं नाही.” तर दुसऱ्या युजरने म्हटलं की ‘पडतानाही त्याने नवरीला पकडलं नाही’. आणखी एका युजरने म्हटलं की, ‘बघा बेजबाबदारपणाचा परिणाम, काय गरज होती एवढं नाचण्याची.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात