Home /News /viral /

VIDEO: आता तर हद्दच झाली! एका VIDEO साठी कुत्र्याला गरगर फिरवून दिलं फेकून

VIDEO: आता तर हद्दच झाली! एका VIDEO साठी कुत्र्याला गरगर फिरवून दिलं फेकून

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पेटा संस्थेनं या तीन तीन तरुणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

    चरखी दादरी, 08 ऑगस्ट : मुक्या प्राण्यांना अमानुषपणे वागणूक दिल्याचे गेल्या काही दिवसांत प्रमाण वाढत आहे. केरळमध्ये गर्भवती हत्तीणीसोबत घडलेल्या प्रकारनंतरही आणखीन काही श्वानांना विष देऊन मारल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. त्यानंतर आता संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर Viral होत आहे. व्हिडीओ काढून सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी एका तरुणीनं श्वानावर अत्याचार केल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की तरुणी सुरुवातील श्वानाला दोन पायांवर चालवते त्याचा खेळ करते आणि मग गरागरा फिरवून रस्त्यावर फेकून देते. या तरुणीचा व्हिडीओ काढणारे लोकही या घटनेची मजा घेत आहे मात्र या तरुणीला कोणीच थांबवण्यासाठी पुढाकार घेत नाही. हरियाणाच्या चरखी दादरी येथे श्वानासोबत होत असलेल्या आत्याचाराचा हा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हे वाचा-Fact Check: 15 किमीपर्यंत गाडी चालवताना हेल्मेट वापरणं गरजेचं नाही? जाणून घ्या जिल्हा नीमली गावात तीन तरुणांनी रस्त्यावर बसून श्वानांसोबत खेळ केले. एक जागा घेत एका तरूणाने पायाने श्वानाला पकडले नंतर गरगर फिरवू लागले, त्याचवेळी एक तरुण आपल्या मित्राचा हा व्हिडिओ शूट करत राहिला. इतकेच नाही तर तिघांनीही आपल्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. तो श्वान मात्र आपल्याला कुणीतरी वाचवावं यासाठी जिवाच्या आकांतानं ओरडत राहिला मात्र त्याचं विव्हळं हे देखील या तीन तरुणांना मजेशीर वाटत होतं. या तरुणांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पेटा संस्थेनं या तीन तीन तरुणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. श्वानाला फेकून दिल्यावर तीन तरुण आपला आनंद साजरा करत आहेत. या प्रकरणी पेटा संस्थेनं पोलिसात तक्रार दाखल केली असून तातडीनं कारवाई करण्याची विनंती पोलिसांना केली आहे. या तीन तरुणांचा पोलिसांकडून व्हिडीओच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या