जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Shocking : सुपरहिरो बनण्यासाठी मुलाचं धक्कादायक पाऊल, केलं असं काही....

Shocking : सुपरहिरो बनण्यासाठी मुलाचं धक्कादायक पाऊल, केलं असं काही....

सुपरहिरो बनण्यासाठी मुलाचं धक्कादायक पाऊल

सुपरहिरो बनण्यासाठी मुलाचं धक्कादायक पाऊल

लहानपणी तर कधी मोठेपणी सर्वांनाच सुपर हिरो बनण्याचा विचार आला असेल. आपल्याकडे पण काहीतरी वेगळी पॉवर असावी असं वाटलं असेल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 30 मे : लहानपणी तर कधी मोठेपणी सर्वांनाच सुपर हिरो बनण्याचा विचार आला असेल. आपल्याकडे पण काहीतरी वेगळी पॉवर असावी असं वाटलं असेल. असाच विचार एका मुलाने केला आणि त्याने सुपर हिरो बनण्यासाठी जे केलं ते वाचून धक्काच बसेल. 2014 मध्ये एका मुलाने सुपर हिरो बनण्याच्या प्रयत्नात स्वतःला इंजेक्शन द्यायला सुरुवात केली. सांगितलं जातं की, 15 वर्षाच्या मुलाने मार्वल सुपरहिरो एक्स-मेन बनण्याच्या नादात स्वतःसोबत धक्कादायक केलं.

News18लोकमत
News18लोकमत

15 वर्षाचा मुलगा 2 वर्षापासून स्वतःला इंजेक्शन देत होता. तो स्पायडर मॅन बनू शकेल या आशेने तो स्पायडरलाही स्वतःला चावून देत होता. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या अहवालात त्याने जाणूनबुजून शरीरात इंजेक्शन टोचल्याचं सांगितलं. मुलगा भारतातील ट्रॉमा सेंटरमध्ये गेला होता, जिथे डॉक्टरांना मुलाच्या डाव्या मनगटावर अनेक न बरे होणारे अल्सर आढळले. त्याने मर्क्युरी इंजेक्शन घेतले होते. हेही वाचा -  shocking step : बायकोने दारु पिण्यापासून थांबवले, रागाच्या भरात नवऱ्याचं धक्कादायक पाऊल इंजेक्शन घेण्यामागे काही मानसिक समस्या असल्याचा संशय डॉक्टरांना होता. त्यावर मुलाने आपण जाणूनबुजून पारा टोचून घेतल्याचा खुलासा केला. अहवालात असे म्हटले आहे की हा मुलगा एक्स-मेनच्या मर्करी या पात्रापासून प्रेरित होता. डॉक्टरांनी सांगितले की त्याला कोणतीही मानसिक समस्या नाही आणि तिचा IQ सामान्य आहे. मुलावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि शस्त्रक्रियेनंतर तो बरा झाला. मुलांवर देखरेख ठेवली पाहिजे आणि मुलांनी घरी असे करण्याचा प्रयत्न करू नये याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. दरम्यान, आजकाल चित्रपट पाहून लहान मुलं तसंच करायला बघतात. कधी कधी ते स्वतःसोबतच खूप धक्कादायक करुन घेतात. ज्यातं त्यांनाही भान नसतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: shocking , Viral
  • First Published :
जाहिरात
जाहिरात