जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आधुनिक श्रावणबाळ! आईला दाखवलं सिंगापूर, Emotional Post ने जिंकलं मन

आधुनिक श्रावणबाळ! आईला दाखवलं सिंगापूर, Emotional Post ने जिंकलं मन

व्हायरल

व्हायरल

आई-वडिल आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी अहोरात्र झटत असतात. आपल्या मुलांनी चांगलं शिकावं मोठं व्हावं, यासाठी आई-वडिल कोणत्याही गोष्टीची कमी पडू न देण्याचे प्रयत्न करतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 जानेवारी : आई-वडिल आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी अहोरात्र झटत असतात. आपल्या मुलांनी चांगलं शिकावं मोठं व्हावं, यासाठी आई-वडिल कोणत्याही गोष्टीची कमी पडू न देण्याचे प्रयत्न करतात. आणि मुलांनी या कष्टाचं चीज केलं तर त्यांच्यापेक्षा आनंदी पालक कोणीच नसतात. सोशल मीडियावर आई-वडिल आणि प्रेमाविषयीच्या अनेक घटना समोर येत असतात. अशातच आणखी एक भावनिक पोस्ट सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. एका मुलाने आपल्या आईला सिंगापूर फिरवलं असल्याचं समोर आलं आहे. आजच्या जगातही श्रवण बाळासारखे मुलं असतात हे पाहून लोक त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव करत आहेत. सिंगापूरमध्ये राहणाऱ्या आणि तेथे काम करणाऱ्या एका भारतीय तरुणाने त्याच्या आईला जगाचा अनुभव घेता यावा यासाठी सिंगापूरच्या टूरवर नेले. तरुणाने याविषयी असलेल्या भावना शेअर केल्या.

News18

दत्तात्रय नाव असलेल्या तरुणाने सोशल मीडियावर आईसोबतचा सिंगापूर दौऱ्यावरचा फोटो शेअर केला. पोस्टमध्ये लिहिलं, त्याच्या आईने तिचे संपूर्ण आयुष्य गावात घालवले आहे आणि तिने कधीही विमान जवळून पाहिले नव्हते. परदेशात प्रवास करणारी त्यांची आई तिच्या पिढीतील पहिली आणि गावातील दुसरी महिला बनली आहे. तो पुढे लिहितो की, मला फक्त एकच गोष्ट खटकते की हे अनुभवण्यासाठी माझे वडील जिवंत असायचे. ते पुढे लिहितात. जे लोक प्रवास करत आहेत त्यांना मी खरोखरच विनंती करतो की त्यांच्या पालकांना कधीतरी त्यांच्यासोबत घेऊन जा आणि त्यांना जगाचा आणखी एक सुंदर भाग दाखवण्याचा प्रयत्न करा. माझ्यावर विश्वास ठेवा, असे करून तुम्ही त्यांचा आनंद मोजू शकत नाही.

News18लोकमत
News18लोकमत

दत्तात्रयने ही पोस्ट लिंक्डइनवर शेअर केली. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून खूप साऱ्या कमेंट येत आहेत. लोक त्याचं तोंडभरुन कौतुक करत आहेत. आपल्या आई-वडिलांना असा आनंदाचा क्षण देणारे खूप कमी तरुण भेटतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात