मराठी बातम्या /बातम्या /Viral /

गर्लफ्रेंडसोबत Movie बघायला गेलेल्या Boyfriendनं थिएटरमध्येच केलं Break Up, कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का

गर्लफ्रेंडसोबत Movie बघायला गेलेल्या Boyfriendनं थिएटरमध्येच केलं Break Up, कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का

Boyfriend Breakup Girlfriend

Boyfriend Breakup Girlfriend

जेव्हा एखादा तरुण आणि तरुणी नव्या नात्यात (relationship) अडकतात तेव्हा दोघ एकमेकांना वेळ देण्याचा खुप प्रयत्न करत असतात. पण पहिल्याच भेटीत एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप केला आहे. तरुणीने ब्रेकअपचे कारण सोशल मीडियवर शेअर केले. कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari
नवी दिल्ली, 9 मार्च: जेव्हा एखादा तरुण आणि तरुणी नव्या नात्यात (relationship) अडकतात तेव्हा दोघ एकमेकांना वेळ देण्याचा खुप प्रयत्न करत असतात. त्यासाठी अनेक कपल निसर्गरम्य वातावरणात फिरायला जाण, मुव्ही पाहायला जाण अधिक पसंत करतात. मात्र, काही गोष्टी खटकल्या असता एकमेकांपासून लांब राहण्याचा निर्णय घेतात. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडसोबत (Boyfriend Breakup Girlfriend) चित्रपट पाहायला गेला असता तिने केलेला प्रकार पाहून थेटरमध्येच ब्रेकअप केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका मुलाने डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून एका मुलीसोबत रिलेशनशिप निर्माण केली. . यानंतर दोघेही फोनवर बोलू लागले. जेव्हा दोघांनी एकमेकांना फोनवर चांगले ओळखले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा भेटण्याचा प्लॅन केला. दोघांनी चित्रपटगृहात भेटायचे आणि चित्रपट पाहायचे असे ठरले. यानंतर मुलाने एका चांगल्या चित्रपटाची दोन तिकिटे काढली आणि मुलीला भेटायला बोलावले. जेव्हा दोघे चित्रपटगृहात पहिल्यांदा भेटले होते, तेव्हा यादरम्यान असे काही घडले की चित्रपटाच्या शेवटी मुलाने मुलीशी संबंध तोडले. ही गोष्टा तरुणीने सोशल मीडियावर शेअर केली. तिच्या प्रियकराने पहिल्याच डेटला तिच्यासोबत ब्रेकअप केले. यामागचे कारण चित्रपट पाहताना ती भर भर स्नॅक्स खात होती. तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी रात्रीचा चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला होता. चित्रपट सुरू होण्यापूर्वी त्याने पॉपकॉर्न घेतले होते. याशिवाय मुलीने स्वत:साठी माल्टेसर चॉकलेट्सची मोठी बॅग घेतली होती. तिच्या सीटवर पोहोचताच तिने चॉकलेट्स खायला सुरुवात केली. यादरम्यान प्रियकराने तिला अडवले आणि चित्रपट सुरू होण्याची वाट पाहण्यास सांगितले. जरी तिला चॉकलेट इतके आवडले होते की चित्रपट सुरू झाल्यानंतर 10 मिनिटांतच चॉकलेटचे मोठे पॅकेट संपले होते. यावेळी तिचा प्रियकर तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होता. तो चित्रपट संपण्याचीच वाट पाहत होता असे वाटले. यानंतर चित्रपट संपताच प्रियकराने तिच्यासोबतचे नाते संपवले. जेव्हा मुलीने ही गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली तेव्हा लोकांनी सांगितले की जे काही झाले ते चांगलेच झाले. तिने स्नॅक्स खाल्ले म्हणून जर तिचा प्रियकर तिला सोडून गेला असेल तर तिने त्याबद्दल आनंद व्यक्त केला पाहिजे.
First published:

Tags: Boyfriend, Breakup, Girlfriend, Relationship, Viral news

पुढील बातम्या