मराठी बातम्या /बातम्या /Viral /तरुणाने प्रेयसीच्या बेडरुमध्ये गुपचुप केलं असं काम....पोलीसही झाले हैराण

तरुणाने प्रेयसीच्या बेडरुमध्ये गुपचुप केलं असं काम....पोलीसही झाले हैराण

व्हायरल

व्हायरल

लोक कधी काय करतील याचा काही नेम नाही. सोशल मीडियावर अनेक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर येत असलेल्या पहायला मिळतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 21 जानेवारी : लोक कधी काय करतील याचा काही नेम नाही. सोशल मीडियावर अनेक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर येत असलेल्या पहायला मिळतात. अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कर्ज फेडण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडच्या बेडरुमध्ये काय केलं असेल याचा आपण विचारही करु शकत नाही. तरुणाचा हा पराक्रम पाहून पोलिसही हैराण झाले.

ब्रिटनच्या मँचेस्टरमधून हा विचित्र आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 30 वर्षीय केविन रोलँड्स यांनी कर्ज फेडण्यासाठी गुप्तपणे त्याची गर्लफ्रेंड आणि लिव्ह-इन पार्टनर सिमोन केनयनच्या रिकाम्या घरात गांजाची शेती केल्याचं समोर आलं . बेडरुमपासून घराच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत त्याने सुमारे 15 लाख रुपयांची भांगेची रोपे लावली होती. पण जेव्हा वीज कंपनीचे लोक गॅस मीटर बसवण्यासाठी केनियनच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना डझनभर भांगाची रोपे दिसली.

हेही वाचा -  प्रियकराने लग्नाला दिला नकार, प्रेयसीने उचललं मोठं पाऊल, तब्बल 96 तास केलं 'हे' काम

सुरुवातीला, चौकशीदरम्यान केविनने हे नाकारले पण शेवटी त्याचं हे कृत्य उघड झालं. न्यायालयात, केविन स्थानिक ड्रग टोळ्यांच्या आदेशानुसार गांजाचे उत्पादन केल्याबद्दल दोषी आढळून आला आणि त्याला 19 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मेट्रो यूकेच्या म्हणण्यानुसार, फिर्यादीचे वकील अँड्र्यू यांनी कोर्टात सांगितले, तपासात केविनच्या बोटांचे ठसे रोपांवर सापडले आहेत. त्याला दोषी ठरवण्यासाठी पुरेसे पुरावे होते. त्यामुळे त्याला गांजाची शेती केल्याप्रकरणी अटक करण्यात आलं.

दरम्यान, हा प्रकार समोर येताच अनेकांना धक्का बसला. या प्रकरणात केविनची प्रेयसी केननची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

First published:

Tags: Britain, Social media, Top trending, Viral, Viral news