जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'मोठा भाऊ समजून मला माफ कर'; GF ला वैतागलेल्या BF चं Breakup Letter वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही

'मोठा भाऊ समजून मला माफ कर'; GF ला वैतागलेल्या BF चं Breakup Letter वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही

'मोठा भाऊ समजून मला माफ कर'; GF ला वैतागलेल्या BF चं Breakup Letter वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही

बॉयफ्रेंडने ज्या गर्लफ्रेंडसाठी हे मजेशीर ब्रेकअप लेटर लिहिलं तिचं हार्ट ब्रेक झालं असेल की नाही माहिती नाही, पण इतरांना मात्र हसू आवरत नाही आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 जुलै : कुणाचंही ब्रेकअप होणं ही नक्कीच आनंदाची बाब नाही. त्या कपलसोबतच त्यांच्या जवळच्या व्यक्तींसाठीही हा धक्का असतो (Breakup story). पण सध्या सोशल मीडियावर एक असं ब्रेकअप लेटर व्हायरल होतं आहे, जे पाहून सर्वांना हसू येत आहे. तुम्हीही लेटर वाचाल तर पोट धरून हसाल. गर्लफ्रेंडला वैतागलेल्या बॉयफ्रेंडचं हे मजेशीर ब्रेकअप लेटर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे (Funny Breakup Letter Viral). एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडच्या चलाखीला इतका वैतागला की त्याने शेवटी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.  सामान्यपणे कुणीही ब्रेकअप केलं की आपण आता एकमेकांच्या संपर्कात राहायचं नाही किंवा आपण आता फक्त फ्रेंड्स राहू असं म्हणतं, पण या तरुणाने तर आपल्या गर्लफ्रेंडचा भाऊ होणं पत्करलं आहे. न भांडता, न रागवता अगदी शांतपणे लेटर लिहित त्याने ब्रेकअप केलं. या लेटरमधील मजकूर मजेशीर आहे. हे वाचा -  CM Bhagwant Mann Wedding : पन्नाशीच्या मुख्यमंत्र्यांचं दुसरं लग्न; कोण आहे त्यांची होणारी बायको? ब्रेकअप लेटरही त्याने अगदी पद्धतीरपणे लिहिला आहे. सुरुवातीला आपल्या गर्लफ्रेंडचं नाव त्यानंतर विषय आणि शेवटी आपलं नाव लिहित सहीसुद्धा केली आहे. लेटरमध्ये नमूद केल्यानुसार तरुणाचं नाव सुजाण असून सुप्रियाच्या नावाने त्याने हे पत्र लिहिलं आहे. मला ब्रेकअप हवं आहे, असं त्याने विषय म्हणून नमूद केलं आहे.

जाहिरात

पत्रात त्याने म्हटलं आहे, “माझी प्रिय एक्स गर्लफ्रेंड. 21 व्या शतकात माझ्यासारख्या कोणत्याच मुलाची तुझ्यासारख्या चलाख मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये राहण्याची हिंमत होणार नाही. म्हणूनच मी आपलं रिलेशनशिप संपवतो आहे. जर माझ्याकडून कोणतीही चूक झाली असेल तर एक मोठा भाऊ समजून मला माफ कर. तुझा एक्स-बॉयफ्रेंड आणि आता भाऊ, सुजाण” हे वाचा -  लेकीचं लग्न ठरवायला आलेल्या व्यक्तीने 40 वर्षीय महिलेला दिलं आपलं हृदय; कारण वाचून डोळ्यात येईल पाणी इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे पत्र व्हायरल होतं आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत. तुम्हाला हे लेटर वाचून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात