जाहिरात
मराठी बातम्या / Viral / सिगारेट पेटवायला गेला आणि स्वतःलाच लागली आग, तरुणाचा Shocking Video व्हायरल

सिगारेट पेटवायला गेला आणि स्वतःलाच लागली आग, तरुणाचा Shocking Video व्हायरल

व्हायरल

व्हायरल

तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेकजण सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढताना दिसतात. सिगारेट ही आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं सांगूनही अनेकजण ती ओढताना आढळून येतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 7 एप्रिल : तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेकजण सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढताना दिसतात. सिगारेट ही आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं सांगूनही अनेकजण ती ओढताना आढळून येतात. सिगारेट ओढल्यामुळे लोकांची अवस्था खूप वाईट होते. याची बरीच उदाहरणेही समोर आली आहेत. अशातच एका तरुणाचा व्हिडीओ समोर आलाय ज्याचा सिगारेटमुळे जीव धोक्यात पडला. सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पोस्ट करून लोकांना धूम्रपान आणि धूम्रपान करण्यापासून रोखले जात आहे. मात्र व्हायरल होत असलेला व्हिडिओ @OnlyBangersEth नावाच्या अकाऊंटद्वारे ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये प्रथम दुकानाच्या आत सोफ्यावर बसलेला एक माणूस दिसतो. अचानक तो उभा राहतो आणि दुकानातल्या टेबलजवळ येतो. सिगारेट काढतो आणि सिगारेट पेटवायला लागतो तेवढ्यात ती पेट घेते आणि तरुणाला आग लागते. आसपासही आग पसरल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येतंय. हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

News18लोकमत
News18लोकमत

१३ सेकंदाचा हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना पहायला मिळाला. या व्हिडीओवर कमेंटचा वर्षाव होत असून व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अनेकजण हे गॅस लीकमुळे झालं असल्याचं म्हणत आहे. सोशल मीडियावर व्हायरल असलेल्या या व्हिडीओच्या सत्यतेबाबत news 18 lokmat याची पुष्टी करत नाही.

जाहिरात

दरम्यान, सिगारेट ओढणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. याचे सतत सेवन केल्याने फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत लोकांना निरोगी राहण्यासाठी आणि धूम्रपान न करण्याबद्दल जागरुक केले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात