जाहिरात
मराठी बातम्या / Viral / छोट्या बहिणीला छेडलं, मोठ्या बहिणीने रोडरोमियोची लावली वाट; भररस्त्यात त्याला...; VIDEO VIRAL

छोट्या बहिणीला छेडलं, मोठ्या बहिणीने रोडरोमियोची लावली वाट; भररस्त्यात त्याला...; VIDEO VIRAL

2 बहिणींनी रोडरोमिओला चोपलं. (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)

2 बहिणींनी रोडरोमिओला चोपलं. (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)

छोट्या बहिणीला छेडणाऱ्या तरुणाला मोठ्या बहिणीने अशी अद्दल घडवली की यापुढे कोणत्या मुलीकडे नजर वर करून पाहणारच नाही.

  • -MIN READ Gujarat
  • Last Updated :

अहमदाबाद, 25 जून :  मुलींच्या छेडछाडीची कितीतरी प्रकरणं समोर येतात. काही मुली भीतीने निमूटपणे सहन करत राहतात. तर काही जशास तसा जवाब देतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. छोट्या बहिणीची छेड काढणाऱ्या रोडरोमिओला मोठ्या बहिणीने चांगलीच अद्दल घडवली आहे. भररस्त्यात त्याला अशी शिक्षा दिली की आयुष्यात कोणत्या मुलीची छेड काय, कोणत्या मुलीकडे पाहण्याचीही त्याची हिंमत होणार नाही. शाळेत जाणारी मुलगी, एक तरुण दररोज तिची रस्त्यात छेड काढत असे. एकदा तर त्याने हद्दच पार केली. तिने रस्त्यातच तिचा विनयभंग केला. मुलगी तशीच घरी गेली आणि आईसमोर खूप रडली. मुलीच्या आईने सांगितल्यानुसार, गुरुवारी सकाळी 6.45 वाजता माझी लहान मुलगी सायकलवरून शाळेत जात असताना विजय सरकटे नावाच्या या व्यक्तीने तिचा हात जबरदस्तीने पकडून तिला भेट देण्याचा प्रयत्न केला. मुलीने गिफ्ट स्वीकारण्यास नकार दिल्याने त्याने ती भेट तिच्या बॅगेत ठेवली. जबरदस्तीने चुंबन घेऊन तिचा विनयभंग केला. माझी मुलगी घरी परतली आणि खूप रडली. मी त्याला खूप समजावले. अर्रर्रर्र! लग्नात हिरोपंती करायला गेला, पण तरुणावर तोंड लपवण्याची वेळ; असं काय घडलं पाहा VIRAL VIDEO पण शुक्रवारी पुन्हा तोच प्रकार. सकाळी त्याने तिला पुन्हा धमकी दिली. तिचा रस्ता अडवून तिचा हात धरला. यावेळी तिची मोठी बहीण तिच्यासोबत पण तिच्यापासून थोडी दूर होती. जसं रोडरोमिओने छोट्या बहिणीला छेडलं मोठी तिथं धावत आली आणि मग दोघींनीही हातात हेल्ट घेऊन त्याला चोपून काढलं. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक तरुण रस्त्यावर आडवा पडला आहे. त्याने आपल्या तोंडावर हात घेतला आहे. एक शाळेच्या युनिफॉर्मधील मुलगी जिच्या हातात बेल्ट आहे ती तिला बेल्टने मारत आहे. गाईला मारत होता लाथ; शेवटी व्यक्तीची इतकी भयानक अवस्था झाली की उठताही येईना, Shocking Video @sanjanausd08 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. null दरम्यान मुलींच्या पालकांनी याप्रकरणी पोलिसातही तक्रार दाखल केली. गुजरातच्या अहमदाबादमधील हे प्रकरण आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात