मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हाय हिल्स आणि लाँग स्कर्ट घालून तरुणीचं जबरदस्त बॅक फ्लिप; अनोखा VIDEO एकदा बघाच

हाय हिल्स आणि लाँग स्कर्ट घालून तरुणीचं जबरदस्त बॅक फ्लिप; अनोखा VIDEO एकदा बघाच

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका रस्त्यावर हाय हिल्स आणि लाल रंगाचं स्कर्ट घालून पारुल अरोडा बॅक फ्लिप मारत आहे

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका रस्त्यावर हाय हिल्स आणि लाल रंगाचं स्कर्ट घालून पारुल अरोडा बॅक फ्लिप मारत आहे

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका रस्त्यावर हाय हिल्स आणि लाल रंगाचं स्कर्ट घालून पारुल अरोडा बॅक फ्लिप मारत आहे

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 25 नोव्हेंबर : सोशल मीडियावर सध्या स्कर्ट आणि हाय हिल्समध्ये बॅक फ्लिप मारणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Video of Back Flip in High Heels and Skirt) होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जे हाय हिल्स घालून आपल्याला नीट चालताही येत नाही, त्यात ते हिल्स घालून ही तरुणी जबरदस्त बॅक फ्लिप मारताना दिसते. तिने इतक्या सहज बॅक फ्लिप मारल्या जणू तिच्यासाठी ही अतिशय सोपी गोष्ट आहे. ही तरुणी जिम्नास्ट पारुल अरोरा (Gymnast Parul Arora) आहे. आपल्या अशाच जबरदस्त बॅक फ्लिपमुळे ती सोशल मीडियावर चर्चेत असते. आता स्कर्ट आणि हाय हिल्समधील तिचा हा नवा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका रस्त्यावर हाय हिल्स आणि लाल रंगाचं स्कर्ट घालून पारुल अरोडा बॅक फ्लिप मारत आहे. तिनं ज्या पद्धतीने बॅक फ्लिप मारत स्मूथ लँडिंग केलं आहे ते खरोखरच हैराण करणारं आहे. तुम्ही पाहू शकता की तिच्या पायातील हिल्सची उंची खूप जास्त आहे. अशात इतक्या उंच टाचेच्या चपला घालून बॅक फ्लिप करणं कोणालाही शक्य नाही. मात्र पारुल हे ज्या पद्धतीने करते, त्यावरुन असं वाटतं की तिच्यासाठी हे अतिशय सोपं आहे.

हा व्हिडिओ पारुलने स्वतःच आपल्या parul_cutearora या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. 12 नोव्हेंबरला शेअर कऱण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाख 39 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. बहुतेक यूजर्स पारुलचा हा जबरदस्त स्टंट पाहून हैराण झाले आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, पारूल तू हाय हिल्स घालून अगदी जबरदस्त बॅक फ्लिप मारली. मी स्निकर्स घालूनही असं काही करू शकत नाही. तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट करत लिहिलं, सांभाळून..अशात पायाला दुखापतही होऊ शकते. एकंदरीतच हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

पारुल हरियाणाच्या अंबाला येथील रहिवासी आहे. ती राष्ट्रीय पातळीवर जिम्नास्टही होती. आता ती जिम्नास्टिक फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी आणि महिलांना प्रेरणा देण्यासाठीच करते. पारुलने याआधीही साडीमध्ये बॅक फ्लिप मारून लोकांना हैराण केलं होतं. तिची मोठी बहीणही जिम्नास्टिक कोच आहे. मात्र त्यांनी कधीही विचार केला नव्हता की साडीमध्येही जिम्नास्टिक शक्य आहे. मात्र पारुलने हेदेखील करून दाखवलं. तिचा हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला होता की अनेक सिने कलाकारांनीही तिचं कौतुक केलं.

First published:

Tags: Stunt video, Video Viral On Social Media