• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • हसावं की रडावं..? स्टंट करताना तरुणाची झालेली अवस्था पाहून पडेल प्रश्न, VIDEO

हसावं की रडावं..? स्टंट करताना तरुणाची झालेली अवस्था पाहून पडेल प्रश्न, VIDEO

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगा स्कूटीसोबत स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी तो सर्वात आधी स्कूटीचा पुढचा भाग उचलण्याचा प्रयत्न करतो

 • Share this:
  नवी दिल्ली 19 नोव्हेंबर : आजकाल प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करू शकतात. अनेकदा लोक आपला जीवही धोक्यात घालतात. सध्या एक अशीच घटना सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक युवक बाईकवर घातक स्टंट (Shocking Stunt Video) करताना दिसतो. मात्र पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत असं काही घडतं जे पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की हसावं की या व्यक्तीची चिंता करावी. असं म्हटलं जातं की आयुष्य एकदाच भेटतं त्यामुळे ते अगदी आनंदात जगायला हवं. मात्र अनेक लोक याचा अजिबातही विचार करत नाहीत आणि आपलं आयुष्य धोक्यात टाकतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती असंच काहीसं करत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा व्हिडिओ ‘Cosas de la Vida’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. बातमी देईपर्यंत दहा हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगा स्कूटीसोबत स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी तो सर्वात आधी स्कूटीचा पुढचा भाग उचलण्याचा प्रयत्न करतो. यानंतर लगेचच ब्रेक दाबून स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, या प्रयत्नात तो उडून थेट जमिनीवर कोसळतो. सुदैवाने दुसऱ्या बाजूने येणाऱ्या गाडीकडे तो कोसळत नाही. लोक हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. लोकांनी या मुलाला सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरनं लिहिलं, याला म्हणतात भावनेच्या भरात विचार न करता काहीतरी करून जाणं. तर आणखी एकानं लिहिलं, की हे हाताने मृत्यूला निमंत्रण देण्यासारखं आहे. इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: