वॉशिंग्टन, 2 फेब्रुवारी : जर तुम्ही असा विचार करत असाल की, फक्त तरुण वयातच (young age) पॉवर लिफ्टिंग करता येते, तर तुमचा हा समज अगदीच चुकीचा आहे. समाजमनात अगदीच घट्ट असलेला हा गैरसमज दूर केला आहे तो एका अमेरिकन महिलेने (American woman). थेट 78 वर्षांची ही महिला स्वतःच्या वजनापेक्षा दुप्पट वजन (double weight) उचलण्यामुळे चर्चेत आली आहे.
या पॉवर लिफ्टिंग (power lifting) करणाऱ्या अवलिया महिलेनं आपल्या इंन्स्टाग्रामवर एक व्हिडियो अपलोड केला आहे. त्यातून ती चर्चेत आली आहे. या व्हिडिओत नोरा लॅग्डन (Nora Langdon) 159 किलो वजनासह स्क्वाट करताना दिसत आहे. ओपन पॉवर लिफ्टिंगच्या सांगण्यानुसार, अमेरीकेत राहणाऱ्या नोराने पहिल्यांदा 2007 मध्ये पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर तिनं कधीच मागं वळून पाहिलं नाही.
View this post on Instagram
गेल्या 14 वर्षांपासून नोरानं एकुण 22 स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. यातील 20 स्पर्धांमध्ये तिनं विजय मिळवला आहे. 2008 ला त्यांनी इंटरनॅशनल पॉवर लिफ्टिंग फेडरेशनच्या स्पर्धेत विजय मिळवला आहे. मिशिगन स्टेट मीटची अमेरिकन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनची 2020 ची स्पर्धाही या महिलेनं जिंकली आहे.
2019 च्या अमेरिकन पॉवर लिफ्टिंग फेडरेशनच्या तर्फे नॅशनल स्पर्धाही नोरानं जिंकली आहे. या महिलेने वाढत्या वयातही आपल्या नावावर 19 वर्ल्ड रेकॉर्ड्स (world records) नोंदवले आहेत. तिच्या या असामान्य आणि यशस्वी कारकिर्दीवरून हेच समजते की, नोरा कायम स्पर्धा जिंकण्यासाठीच मैदानात उतरत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.