किशोर चुडासामा, (जामनगर) 28 मार्च : तुमच्या शरिरात जर रक्तच कमी असेल तर तुम्हाला विवाध आजारांना सामोरे जाण्याची वेळ येत असते. दरम्यान रक्त दिल्याने रक्त वाढत असते हे विविध आरोग्य यंत्रणांकडून सांगण्यात येते. आजच्या आधुनिक काळातही रक्तनिर्मितीबाबत विशेष कृत्रिम तंत्रज्ञान निर्माण झालेले नाही. यामुळे आपण एखाद्याला रक्त दिल्यानंतर दुसऱ्याचा जीव वाचू शकतो. थॅलेसेमिया आणि गरोदर महिलांना रक्ताची नितांत गरज असते त्यामुळे सर्वांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याची सध्या गरज आहे.
दरम्यान जामनगरचे समाजसेवक मेहुलभाई मनसुखलाल मेहता हे मार्गदर्शक ठरले आहेत. त्यांनी आतापर्यंत 132 वेळा रक्तदान करून मानवसेवेची ज्योत प्रज्वलित केली आहे. जामनगर येथे राहणारे मेहुलभाई मेहता यांनी इयत्ता 11 वी मध्ये शिकत असताना पहिल्यांदा रक्तदान केले. यावेळीपासून त्यांनी दर तीन महिन्यांनी रक्तदान करण्याची पद्धत अवलंबली. यामुळे त्यांनी आतापर्यंत 132 वेळा रक्तदान केले आहे. यातून त्यांनी अनेकांचे प्राण वाचल्याचेही सांगितलं.
भलामोठा हत्ती गाडीसमोर उभा राहताच पर्यटक करू लागले मंत्रोच्चार; पुढे जे झालं ते चकित करणारं, VIDEOदर तीन महिन्यांनी नियमित रक्तदान करून रक्ताच्या गरजेसाठी झगडणाऱ्या रुग्णांना जीवनदान देण्याचे अनोखे कार्य मेहता करत आहेत. एखाद्या रुग्णाला कामाच्या वेळेत किंवा अगदी मध्यरात्री तातडीच्या वेळी रक्ताची गरज भासली आणि मेहुलभाईंशी संपर्क साधला तर मेहुलभाई आजही सगळी कामं सोडून रक्तदानासाठी धावतात.
यावेळी मेहुलभाई म्हणाले की, त्यांना एकदा रात्री अडीच वाजता रक्तदानाबद्दल फोन आला. यावेळी त्यांनी रुग्णालयात धाव घेतली, सर्पदंश झालेल्या आदिवासी बालकाला रक्ताची विशेष गरज होती. यावेळी रात्री अडीच वाजताही त्यांनी रक्तदान केले होते, मात्र साप चावलेला मुलगा मृत्यू झाल्याने त्यांना वाईट वाटल्याचे सांगितलं. ते शिबिर किंवा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात रक्तदान करत नाहीत. याचे कारण असे की एकदा रक्तदान केल्यानंतर 3 महिने रक्तदान करता येत नाही. म्हणून ते वैयक्तीक गरजेवेळी रक्तदान करतात.
त्यामुळे मी रक्तदानाचे कार्यक्रम टाळतो जेणे करून मी मध्यरात्रीही जेव्हा हॉस्पिटलला आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासते तेव्हा रक्त देण्यासाठी पहिल्यांदा जातो. एवढेच नव्हे तर तरुणांना रक्तदानासाठी सातत्याने प्रोत्साहन देऊन समाजाला प्रेरणाही दिली आहे. रक्तदानानंतर शरीरालाही फायदा होत असल्याने प्रत्येकाने रक्तदान करावे असे आवाहन त्यांनी केले.