जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO: यांना आवरा! एका स्कूटीवर चौघी बसल्या, मग मुंबईच्या रस्त्यावर नको ते पराक्रम, पोलिसांत पोहोचलं प्रकरण

VIDEO: यांना आवरा! एका स्कूटीवर चौघी बसल्या, मग मुंबईच्या रस्त्यावर नको ते पराक्रम, पोलिसांत पोहोचलं प्रकरण

VIDEO: यांना आवरा! एका स्कूटीवर चौघी बसल्या, मग मुंबईच्या रस्त्यावर नको ते पराक्रम, पोलिसांत पोहोचलं प्रकरण

मुंबईच्या रस्त्यावर एक मुलगी स्कूटी चालवत आहे, तर तिच्या मागे आणखी तीन मुली बसल्या आहेत. वाहनाचा वेग इतका आहे की चारचाकी वाहनेही मागे राहिली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 28 मार्च : इंटरनेटचं जग अतिशय अजब आहे. इथे अनेक अशा गोष्टी पाहायला मिळतात, ज्या थक्क करणाऱ्या असतात. यासोबतच आपल्याला मोठ्याने हसवणारे मजेदार व्हिडिओ असो किंवा आपल्या सर्वांना भावुक करणारी इमोशनल क्लिप असो, इथे निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतात. सोशल मीडियावर लोक अनेकदा विचित्र पद्धतीने स्कूटी चालवणाऱ्या मुलींना ‘पापा की परी’ म्हणून संबोधतात, आता असाच आणखी एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. भलामोठा हत्ती गाडीसमोर उभा राहताच पर्यटक करू लागले मंत्रोच्चार; पुढे जे झालं ते चकित करणारं, VIDEO यात दिसतं, की मुंबईच्या रस्त्यावर एक मुलगी स्कूटी चालवत आहे, तर तिच्या मागे आणखी तीन मुली बसल्या आहेत. वाहनाचा वेग इतका आहे की चारचाकी वाहनेही मागे राहिली. विशेष म्हणजे चारपैकी यातील कोणत्याही मुलीच्या चेहऱ्यावर भीती दिसत नाही. एकाच स्कूटीवर हेल्मेट न घालता फिरणाऱ्या चार मुलींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जाहिरात

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. उड्डाणपुलावरुन मुली जराही न घाबरता भरधाव वेगाने गाडी चालवत असल्याचं दिसून येतं. इतकंच नाही तर गाडी चालवताना त्या सेल्फीही घेत होत्या. त्यांना अपघात किंवा इतर कशाचीही चिंता नव्हती. रस्त्यावर चारचाकी चालवणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात याचा व्हिडिओ शूट केला आणि तेव्हापासून तो खूप बघितला जात आहे. एका वापरकर्त्याने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आणि लिहिलं, “वाशीच्या पाम बीच रोडवर 1 स्कूटीवरून प्रवास करणाऱ्या 4 मुली हेल्मेटशिवाय व्हिडिओ आणि सेल्फी घेत आहेत.”

News18लोकमत
News18लोकमत

त्या व्यक्तीने पुढे लिहिलं, “आनंद ही एक वेगळी गोष्ट आहे. मात्र हे अतिशय धोकादायक असल्याचं दिसतं. यंग ब्लडला अधिक जागरूकतेची आवश्यकता आहे. कदाचित जास्त दंडच अशी कृत्य आटोक्यात आणेल. तारीख: 25/03/23 17:12 वेळ.” कोणीतरी नवी मुंबई पोलिसांना टॅग करून याबाबत तक्रार केली. यावर नवी मुंबई पोलीस म्हणाले, “नवी मुंबई पोलिसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद, कृपया आवश्यक कारवाईसाठी अचूक ठिकाण आणि मोबाइल नंबर पाठवा.” या पोस्टवर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शेवटी नवी मुंबई पोलिसांनी ‘नंबर प्लेट नीट दिसत नाही’ असं म्हटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात