नवी दिल्ली, 23 जून : दारू म्हटलं की त्याच्यासोबत काही ना काही चकना, खाणं आलंच. काही लोक दारू सोबत मसाला एग खातात. पण आता खास दारूड्यांसाठी स्पेशन ऑमलेट तयार करण्यात आलं आहे. दारूप्रेमींसाठी असलेल्या या खास ऑमलेटचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ऑमलेट म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल पण व्हिडीओ पाहून ती खाण्याची तयारी आहे का ते सांगा. तसं साधं ऑमलेट, चीझ ऑमलेट, फ्लफी ऑमलेट, टोमॅटो ऑमलेट, स्पॅनिश ऑमलेट असे एक ना दोन ऑमलेटचे कितीतरी प्रकार आहेत. ते बनवण्याची पद्धत आणि त्यात वापरले जाणारे इतर पदार्थ त्यानुसार वेगवेगळे ऑमलेट आहेत. यात आता आणखी एका ऑमलेटची भर पडली आहे. हे ऑमलेट खास दारू पिणाऱ्यांसाठी आहे.
सामान्यपणे ऑमलेट बनवण्यासाठी तेल वापरलं जातं. पण हे स्पेशल ऑमलेट बनवण्यासाठी तेल नाही तर बिअर वापरली जाते. तेलाचा एक थेंबही न वापरता फक्त बिअर वापरून हे ऑमलेट बनवतात. यासाठी बिरा बुम बिअर वापरली जाते. एक्स्ट्रा स्ट्रॉंग बिअरचा वापर केला जातो. बस्सं फक्त एक बाटली दारूची कमाल! फळफळलं नशीब, लखपती बनली व्यक्ती व्हिडीओत तुम्ही पाहाल तर तव्यावर तेलाऐवजी ही बिअरच ओतली जाते आणि त्यावर अंडं आणि ऑमलेटसाठी इतर साहित्य टाकलं जातं. त्यानंतर पुन्हा ऑमलेटच्या भोवताली आणि वरूनही बिअर ओतली जाते. बिअरमध्येच ऑमलेट शिजवलं जातं. व्हिडीओ सांगितल्यानुसार एका ऑमलेटसाठी बिअरची अर्धी बाटली वापरली जाते. ऑमलेट तसं ऑमेलटसारखं सहज निघत नाही ते थोडं कुस्करलं जातं. असं ऑमलेट एका डिशमध्ये काढून ते सर्व्ह केलं जातं. व्हिडीओत म्हटल्यानुसार या ऑमलेटमुळे नशा चढेल की नाही माहिती नाही पण इतकी स्ट्रॉंग बिअर वापरल्याने पोटात आग मात्र नक्की होईल. chandrapur news : ग्राहकाची उरलेली बिअर प्यायल्यामुळे वेटरचा मृत्यू, बारमधला घटनाक्रम ऐकून पोलीसही चक्रावले Food Minatiez इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हे ऑमलेट नेमकं कुठे मिळतं ते माहिती नाही. पण इंडियन स्ट्रीट फूड म्हणून सांगण्यात आलं आहे. म्हणजे भारतातच कुठेतरी रस्त्यावरील विक्रेत्याकडे हे ऑमलेट मिळत आहे.
तुम्हाला हे ऑमलेट कुठे मिळतं ते माहिती आहे का? तुम्ही हे ऑमलेट खाल्लं आहे का? हे ऑमलेट तुम्हाला दिलं तर खाण्याची तुमची तयारी आहे का? हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या दारूप्रेमी मित्रमैत्रिणींनासुद्धा त्यांच्यासाठी या स्पेशल ऑमलेटची ही स्टोरी शेअर करायला विसरू नका.