भोपाळ, 03 सप्टेंबर : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कच्चा बादामने धूमाकूळ घातला होता. आता असाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कच्चा बादामनंतर भोपाळी नमकीनची धूम आहे. मध्य प्रदेशमधील भोपाळच्या नमकीन विक्रेत्याचा हा व्हिडीओ जबरदस्त चर्चेत आहे. एका हटके स्टाइलमध्ये हा विक्रेता नमकीन विकताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं आहे. व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती स्कूटवर बसलेली आहे. तिच्या पुढ्यात मोठी पिशवी दिसत आहे. या पिशवीत नमकीन आहे. वेगळ्यात अंदाजात ओरडत तो ग्राहकांना नमकीन घ्यायला सांगतो आहे. त्यानंतर तिथं एक ग्राहक त्याच्याकडे नमकीन घ्यायला येतो आणि काय काय नमकीन आहे, हे विचारतो. तेव्हा हा नमकीनवाला गाण्यातच आपल्याकडे असलेल्या नमकीनची यादी सांगतो. हे वाचा - VIDEO : मेरी शादी करवाओ! तरुणामागे पळत सुटली तरुणी; लग्नासाठी भररस्त्यात ड्रामा @manishbpl1 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. भोपाळी नमकीनवाला. भोपाळमध्ये टॅलेंटची कमी नाही, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
#भोपाली नमकीन वाला... #भोपाल में टैलेंट की कमी नहीं... आप ही देखिये किस गज़ब अंदाज से जनाब नमकीन बेच रहें हैं..👍#Bhopal pic.twitter.com/ONEiMgko60
— manishbpl (@manishbpl1) September 2, 2022
नमकीनवाल्याचा हा नमकीन विक्रीचा जबरदस्त अंदाज सर्वांना आवडला आहे. आता कच्चा बादामप्रमाणे या व्हिडीओलाही तितकाच प्रतिसाद मिळतो का, या नमकीवाल्याची जादू चालेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेलं. हे वाचा - Devar bhabhi Dance : दीराच्या लग्नात वहिनीनं धरला असा ताल, पाहून सगळेच झाले थक्क तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.