नवी दिल्ली, 3 मार्च : Woman Dance Viral Video : सोशल मीडियावर (Viral Video on Social Media) एकापेक्षा एक मजेशीर आणि रंजक व्हिडीओ पाहायला मिळतात. यादरम्यान एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला हाहाकारी डान्स करताना (Funny Dance Video of Woman) करताना दिसत आहे. तिचा डान्स पाहून घरातील मंडळीही हैराण झाली. कुटुंबीय महिलेचा धमाकेदार डान्स रोखण्याचा प्रयत्न करतात, मात्र ती त्यांचं काहीच ऐकत नाही. वहिनीचा हा जबरदस्त डान्स तेथील लोक उभं राहून पाहत आहे. मात्र कुटुंबाला महिलेचा डान्स पाहून लाजल्यासारखं वाटत आहे. सोशल मीडियावर लोक या व्हिडीओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. हे ही वाचा- VIDEO - कंबर मोडली, मान लचकली; ‘पुष्पा’च्या ‘श्रीवल्ली’वर नाचून वऱ्हाड्यांचे हाल कोणाचाही विचार न करता मनसोक्त डान्स केला… व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका गावातील असल्याचं सांगत आहे. घराबाहेर रस्त्यावर एक महिला मनसोक्तपणे नाचत आहे. आजूबाजूचे लोकही याचा आनंद घेत आहे. काहींनी हे सर्व मोबाइलवर कैद केलं आहे. आजूबाजूचे लोक महिलेला थांबवण्याचा प्रयत्न करतात, मात्र ती कोणाचंही ऐकत नाही.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलं आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 1 लाख 43 हजार लाइक्स आले आहेत. एका युजरने लिहिलं की, हा स्वस्त नशाची कमाल आहे. तर एक नेटकरी म्हणाला की, बहुतेक देवी अंगात आली वाटतं..