नवी दिल्ली, 4 जानेवारी : आजकाल वाढणाऱ्या वीज बिलामुळे लोक खूप त्रस्त आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे वाढलेलं विज बिल सर्व सामान्य नागरिकांना भरण्यासाठी नाकीनऊ येत आहेत. तोच दुसरीकडे सोशल मीडियावर एक स्वातंत्र्यापूर्वी घराचे वीज बिल व्हायरल होत आहे. 83 वर्ष जुनं हे वीज बिल सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
हॉटेलची बिले, जुन्या मोटारसायकलची बिले, जुनी बाजाराची बिले अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. असंच सध्या जुनं स्वातंत्र्यापूर्वी चं वीज बिल व्हायरल होतंय. स्वातंत्र्यापूर्वी घराचे वीज बिल किती आले असते याचा कधी विचार केला आहे का? महिन्याभराच्या वीज बिलाची किंमत पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
हेही वाचा - तरुणानं उंच इमारतीवरुन मारली उडी, श्वास रोखून धरणारा Video
व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये, 1940 साली संपूर्ण महिन्याभराचं वीज बिल फक्त 5 रुपये आलं होतं. महिनाभर फक्त 5 रुपयात घरात वीज वापरली जात होती. हे वीज बिल व्हायरल होताच लोक आजच्या आणि त्या काळातील बिलाची तुलना करत आहेत. या व्हायरल झालेल्या जुन्या बिलात केवळ 3.10 रुपयांची वीज वापरण्यात आल्याचं दिसत असून कर जोडल्यानंतर हे बिल 5.2 रुपये झाले आहे. त्यावेळी वीजबिल हातानं लिहिलेलं होतं ते व्हायरल बिलात पाहायला मिळत आहे.
1940: Electricity bill of The Bombay Electric Supply & Tramways Co Ltd pic.twitter.com/jfa7RqbRz4
— Mumbai Heritage (@mumbaiheritage) August 7, 2020
स्लिपवर तुम्ही पाहू शकता की हे वीज बिल 15 ऑक्टोबर 1940 चे आहे आणि ते बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवे कंपनी लिमिटेड या खाजगी कंपनीचे आहे जी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) 7 ऑगस्ट 1947 रोजी ताब्यात घेतली होती.
दरम्यान, आजकाल विजेशिवाय जगणं कठीण झालं आहे. घरातील टीव्ही, फ्रीज, पंखा, एसी या सर्व गोष्टी विजेवर चालतात. घरातील वीज वापरण्यासाठी भरपूर बिल द्यावं लागतं. आजच्या काळात सामान्य वीज वापरणाऱ्या घराला एक हजार ते दोन हजार रुपयांचे बिल येते. जास्त वीज वापरल्यास हे बिल आणखी वाढते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Electricity, Electricity bill, Photo viral, Social media, Top trending, Viral news