जाहिरात
मराठी बातम्या / Viral / तरुणानं उंच इमारतीवरुन मारली उडी, श्वास रोखून धरणारा Video

तरुणानं उंच इमारतीवरुन मारली उडी, श्वास रोखून धरणारा Video

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे जिथे कधी काय आणि कोण व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडियामुळे लोकांचं जीवन एका रात्रीत बदलतं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 4 जानेवारी : सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे जिथे कधी काय आणि कोण व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडियामुळे लोकांचं जीवन एका रात्रीत बदलतं. त्यामुळे लोक आजकाल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. आपल्या दैनंदिन जीवनातल्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात. विशेषतः सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी काहीही करायला तयार असतात. व्हायरल होण्यासाठी अनेक व्हिडीओंमध्ये लोक आपल्या जीवाशीही खेळ करताना दिसतात. असाच काहीसा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधत आहे. जगातील अनेक लोक साहसी खेळांसोबतच स्टंटबाजी करताना दिसतात. जे अत्यंत धोकादायक आहे. नुकताच व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तरुण आपल्या जीवाची काळजी न करता बिल्डिंगवरुन उडी मारतो. हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओवर लोक अनेक प्रतिक्रियाही देत आहेत.

जाहिरात

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तरुण स्टंटबाजी करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये एक तरुण इमारतीच्या एका छतावरुन दुसऱ्या छतावर उडी मारत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे दोन्ही इमारतींच्या मध्ये बरंच अंतर आहे तरीही तरुणाने आपल्या जीवाशी खेळ करत हा स्टंट केला आहे. अशा स्टंटमध्ये एक छोटीशी चुकही एखाद्याचा जीव घेऊ शकते. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली असून ते व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आजकाल जगभरातील पार्कर अॅडव्हेंचर गेममध्ये तरुणाई हात आजमावताना दिसत आहे. खूप धक्कादायक आणि श्वास रोखून ठेवणारे स्टंट आजची तरुणाई करताना दिसते. यामुळे लोक जरी चर्चेत येत असले तरी ही खूप धक्कादायक गोष्ट अजून एक चूक आणि जीव जाऊ शकतो. त्यामुळे अशा गोष्टी तुम्ही करण्याचा प्रयत्न करु नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात