मुंबई, 04 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून प्राण्याचे खूप व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये कधी खेळताना, कधी शिकार करताना तर कधी खोड्या काढताना. पण आता चर्चा सुरू आहे ती एका अस्वलाची. याचं कारण पण तेवढंच खास आहे. या अस्वलानं जे भन्नाट हावभाव केले आहेत त्याला तोड नाही. मिळालेल्या माहितीनुसार हे अस्वल कचऱ्यानं भरलेल्या ट्रकवर चढलं होतं. खाली उतरण्यासाठी तयार नव्हतं. त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली तर काही जणांनी त्याचे फोटो काढायला सुरुवात केली. या अस्वलानं ट्रकवर चढून भन्नाट हावभाव केले आणि ते लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद करून घेतले आहेत. या अस्वलाचे हावभाव सोशल मीडियावर लोक झूम करून पाहात आहेत. आपल्या हावभावासाठी हे अस्वल सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चेत आहे.
हे वाचा- आता तर हद्दच झाली! घोड्यानं चक्क नाकाने वाजवला पियानो, पाहा VIDEO अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया प्रांतात हा संपूर्ण प्रकार घडला आहे. एखाद्या चित्रपटात घडावा अगदी तसा काहीसा प्रकार घडला आणि सगळेच आश्चर्यचकीत झाले. या फोटोंमध्ये पाहिलत तर खूप वेगळ्या पद्धतीनं हे अस्वल हसत असल्याचं पाहायला मिळत आहे.सरतेशेवटी ही गाडी पोलीस ठाण्यापर्यंत घेऊन जाण्यात आली आणि अस्वलाला उतरवण्याचे प्रयत्न सुरू झाले. फेसबुकवर 14 हजारहून अधिक लोकांनी हे फोटो पाहिले आहेत. हे अस्वल ट्रकवरून छान प्रवासाचा आनंद घेत असल्याचं एका युझरनं म्हटलं आहे. छोट्या मोठ्या खोड्या करून अस्वलाला देखील कंटाळा आला असेल म्हणून त्याने हा प्रकार केल्याचं दुसऱ्या युझरनं म्हटलं आहे.