मुंबई, 02 ऑक्टोबर : सोशल मीडियावर प्राण्यांच्या करामतीचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात कधी लढाई करताना कधी शिकार करताना तर कधी कलाकुसर किंवा खेळताना अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. बऱ्याचदा आपण प्राणी गाणी ऐकताना किंवा म्युझिकल कॉन्सर्ट किंवा संगीत ऐकतानाचेही व्हिडीओ पाहिले असतील पण वाद्य वाजवतानाचे व्हिडीओ फार दुर्मीळ पाहायला मिळतात. श्वान किंवा मांजरच एखाद्यावेळी कधीतरी वाद्य वाजवतानाचा व्हिडीओ पाहायला मिळतो पण चक्क एका घोड्यानं वाद्य वाजवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मांजर, श्वान असेल तर पायानं आणि माणूस हातानं पियानो वाजवताना पाहिला आहे पण या घो़ड्यानं तर हद्दच केली. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की एक घोडा आपल्या श्वासाच्या मदतीनं पियानो वाजवत आहे. नाकाने पियानो वाजवणाऱ्या या घोड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
🤔........⬇️ pic.twitter.com/mKaDUobOtl
— Archive (@ArchiveRef88) September 24, 2020
Finally, a piano-playing horse is in sight!
— Raky Redfeathers (@RakyRedfeathers) October 2, 2020
अडीच हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेक युझर्सनी कमेंट्स केल्या आहेत. कुणी त्याला जगभरातील पियानो वादकांसोबत कंपेअर केलंय तर कुणी बुद्धीमान घोडा अशी उपमाच जणू दिली आहे. याआधी हा व्हिडीओ burrrnt chicken nugget नावाच्या युझरनं युट्यूबला 11 ऑगस्ट रोजी शेअर केला होता. या घोड्याचं कौशल्य पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. कुणी या घोड्याच्या डोक्यावर पियानो वाजवण्याचं भूत चढलं असं म्हणत आहे तर कुणी हा घोडा पियानो वाजवण्यात पटाईत असल्याचं म्हणत आहे. एकूणच सोशल मीडियावर नाकाने पियानो वाजवणाऱ्या या घोड्याची मात्र तुफान चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.