मराठी बातम्या /बातम्या /Viral /दिसायला सुंदर तरी सिंगल! शेकडो तरुणांना डेट करूनही मॉडेलला मिळाला नाही लाइफ पार्टनर कारण...

दिसायला सुंदर तरी सिंगल! शेकडो तरुणांना डेट करूनही मॉडेलला मिळाला नाही लाइफ पार्टनर कारण...

ब्रिटिश मॉडेल एप्रिल बनबरीने (April Banbury) 100 तरुणांना डेट केलं पण तिला अद्यापही हवा तसा बॉयफ्रेंड मिळाला नाही.

ब्रिटिश मॉडेल एप्रिल बनबरीने (April Banbury) 100 तरुणांना डेट केलं पण तिला अद्यापही हवा तसा बॉयफ्रेंड मिळाला नाही.

ब्रिटिश मॉडेल एप्रिल बनबरीने (April Banbury) 100 तरुणांना डेट केलं पण तिला अद्यापही हवा तसा बॉयफ्रेंड मिळाला नाही.

लंडन, 25 फेब्रुवारी : आपल्या लाइफ पार्टनरबाबत प्रत्येक तरुणीचं एक स्वप्नं असतं आणि तिला तसाच जोडीदार तिला हवा असतो. अशाच स्वप्नातील राजकुमाराच्या शोधात आहे ती एक सुंदर मॉडेल. गेल्या कित्येक महिन्यांपासून ती खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे. त्यासाठी तिने हालचालही सुरू केली. शेकडो तरुणांना तिने डेट केलं पण अजूनही ती सिंगल आहे (Woman Dated 100 Men Remains Single). तिला अद्यापही तिचा परफेक्ट लाइफ पार्टनर मिळाला नाही (Beauty Queen Dated 100 Men) .

ब्रिटिश मॉडल एप्रिल बनबरी (April Banbury) ब्युटी क्वीनचा किताब तिने जिंकला होता. करिअरमध्ये यशस्वी ठरलेली ही सुंदर मॉडेल जोडीदाराच्या बाबतीत मात्र तिचं नशीब तिला साथ देत नाही आहे. बनबरीने तब्बल 100 तरुणांना डेट केलं. पण आतापर्यंत तिला हवा तसा बॉयफ्रेंड भेटला नाही.

हे वाचा - Shocking! फक्त सर्दी झाली आणि कोमात गेली महिला; आयुष्याची 20 वर्षेही विसरली

ग्लॅमरस इंडस्ट्रीमध्ये एंट्री केल्यानंतर बनबरीने मॉडलिंग केली आणि आता ती वेडिंग ड्रेस डिझाइन करते. त्यामुळे बऱ्याच लग्नांशी तिचा संबंध येतो. जेव्हा ती लग्नात जाते तेव्हा लोक तिला लग्नाबाबत विचारतात. तेव्हा ती स्वतःच विचारात पडते. कारण 100 तरुणांपैकी तिला एकही तिच्या योग्य वाटला नाही.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार बनबरीने डेटिंगमार्फत चांगला बॉयफ्रेंड शोधण्याचा प्रयत्न केला. तिने यासाठी डेटिंग अॅपचीही मदत घेतली. असं नाही की तिला तिथं मुलं भेटली नाहीत. तिने 100 मुलांना डेट केलं. पण त्यापैकी एकातही तिला खरा प्रेमी सापडला नाही. ती सांगते आपण आपल्या कोणत्याच डेटला दुसरी संधी देत नाही. गेल्या वर्षापासून ती आपल्या खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे.

हे वाचा - Love Addiction मध्ये अडकले आहात का? नैराश्याकडे नेऊ शकतं हे प्रेमाचं व्यसन

आपल्या एका डेटिंग किस्साही तिने सांगितला. एका तरुणाला तिने यासाठी रिजेक्ट केलं कारण तो आपल्या नाकाला वारंवार हात लावत होता. एकाने खाण्याचं बिल दिल नाही, तर एकाला तिने आपल्या फोनवरच ब्लॉक केलं. काही तरुण अनेक तरुणांना डेट करतात तिला अशी रिलेशनशपही आवडत नाही. तिने 2020 साली मिस ग्रेट ब्रिटनचा किताब जिंकला आहे. नात्याबाबत तिला बिलकुल घाई करायची नाही.

First published:

Tags: Lifestyle, Model, Viral