मुंबई, 25 फेब्रुवारी: कोणतीही गोष्ट प्रमाणात असली तर ती योग्य असते; मात्र प्रमाणाच्या बाहेर गेली तर नुकसान होतं. आपल्याकडे एक म्हण देखील आहे, अति तिथे माती! म्हणजे जिथे जास्त असेल तिथे शेवटी नुकसान होतं. तसंच प्रेमाचेही आहे. प्रेम करणं चांगली गोष्ट आहे; मात्र जेव्हा हे प्रेम प्रमाणाच्या बाहेर जातं, तेव्हा याच प्रेमाचं व्यसनात (What is Love Addiction) रूपांतर होतं. अनेक जण लव्ह अॅडिक्शनच्या जाळ्यात अडकेलेले पाहायला मिळतात. लव्ह अॅडिक्शनमुळे काय होते? लव्ह अॅडिक्शनमुळे हळूहळू एखादी व्यक्ती स्वतःपेक्षा दुसऱ्यांना स्वत:पेक्षा जास्त प्राधान्य द्यायला लागते. लव्ह अॅडिक्शन ज्यांना होते, ती व्यक्ती इतरांच्या तुलनेत जास्त भावनिक झालेली पाहायला मिळते. या सर्व प्रकारामुळे ती व्यक्ती डिप्रेशन (Reasons for Depression) म्हणजे तणावाची शिकार होते. तुम्ही लव्ह अॅडिक्शनच्या जाळ्यात अडकले आहात की नाही, हे कसं ओळखायचं आणि यातून कसं बाहेर पडावं, याबाबत जाणून घेऊ या. हे वाचा- तुम्हालाही आहेत आरोग्याच्या ‘या’ समस्या? मग चुकुनही खाऊ नका पपई एकटं राहू न शकणं तुम्ही तुमच्या आवडच्या व्यक्तीशिवाय एकटं राहू शकत नसाल, तर तुम्ही लव्ह अॅडिक्शनच्या जाळ्यात अडकला आहात. हे लव्ह अॅडिक्शनचं सर्वांत मोठं लक्षण आहे. या परिस्थितीत जोडीदारा व्यक्तिरिक्त स्वत:चा एकटा वेळ घालवणंदेखील तितकंच महत्त्वाचं आहे, हे तुम्ही स्वत:ला देखील समजावायला हवं. जोडीदाराकडे जाण्यासाठी कारण शोधणं लव्ह अॅडिक्शनच्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीला प्रत्येक वेळी कायमच प्रेमाची कमतरता भासत असते. संबंधित व्यक्ती त्या व्यक्तीजवळ जाण्यासाठी कारणं शोधत असते. नात्याची सुरुवात होताना या गोष्टी स्वाभाविक आहेत; मात्र नंतरही असंच सुरू राहिलं तर हे धोकादायक आहे. यासाठी तुम्हाला सतर्क होणं गरजेचं आहे. तसंच आपल्या मनाला वेगळी दिशा देणं गरजेचं आहे. स्वत:ला दुसऱ्या गोष्टीमध्ये गुंतवणं गरजेचं आहे. हे वाचा- आई बनलेल्या कोणत्याही महिलेला इरिटेट करतात या गोष्टी; त्यांना असं कधीच म्हणू नये अनेकांना त्यांच्या जोडीदाराव्यतिरिक्त काहीच दिसत नाही. ते त्यालाच सर्व काही मानतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराशिवाय एक तासही राहू शकत नसाल, तर नक्कीच तुम्हाला त्याची सवय झाली आहे. त्याच्यात काही चुकीचं असेल, तरीही तुम्ही शांतच राहता. त्या व्यक्तीमध्ये कितीही वाईट गुण असतील, तरीसुद्धा तुम्हाला त्याच्या चांगल्याच गोष्टी नजरेस पडतील. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला सर्वस्व मानत असाल, तर तुम्हाला नक्कीच थोडा विचार करण्याची गरज आहे. हे आंधळं प्रेम नाही ना, याची खात्री करून घेणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.