मराठी बातम्या » फोटोगॅलरी » बातम्या » Oh No! Construction site वर काम करते मॉडेल, म्हणते सौंदर्याचा होतो त्रास

Oh No! Construction site वर काम करते मॉडेल, म्हणते सौंदर्याचा होतो त्रास

अनेकदा कामाच्या ठिकाणी महिलांना पुरुषांच्या तुलनेत भेदभावाची वागणूक मिळते. काही ठिकाणी महिलांवर अन्याय केला जातो, तर काही ठिकाणी महिलांना पुरुषांपेक्षा कमी लेखलं जातं. अमेरिकेतील मिशिगनमध्ये राहणाऱ्या ऑटम वेस्टफॉल हिची तर वेगळीच कैफियत आहे. आपल्या सौंदर्यामुळे आपल्याला कुणीच गांभिर्यानं घेत नाही, असं ती म्हणते. ती दिसायला सुंदर आहे आणि रोज नटून थटून कामावर येते, त्यामुळे तिला कष्टाची कामंदेखील कुणी देत नाही.