रोम, 26 मे : कोरोनामुळं सध्या लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं सर्व प्राणी जंगलातून बाहेर रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार इटलीमध्ये घडला. 12 वर्षांचा मुलगा डोंगरावर चढला फोटो काढून घेण्याच्या नादात त्यानं मागे पाहिलं नाही. पण त्यांच्या मागून एक भल मोठं जंगली अस्वल येत होतं. मुलगा हळू हळू खाली उतरला म्हणून सुदैवानं वाचला. उत्तर इटलीतील हिल्स ऑफ ट्रेन्टिनो येथे एका तपकिरी अस्वलानं 12 वर्षांच्या अलेक्झांडरचा सुरू केला. अलेक्झांडर कुटुंबासमवेत हायकिंग करत होता. द सनच्या वृत्तानुसार, घाबरून न जाता हा मुलगा शांत राहिला आणि आईच्या सूचनेचे पालन करून तो खाली आला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- मनाला चटका लावणारी 46 सेकंद! हा VIDEO पाहून तुम्हाला कळेल मजूरांची खरी अवस्था
वाचा- कोरोनामुळे 70 वर्षांनंतर झाली ताटातूट, अखेर अशी झाली भेट! हा VIDEO पाहाच स्थानिक वृत्तपत्र L’Adige नं दिलेल्या वृत्तानुसार, अलेक्झांडरनं अस्वल पाहिल्यावर शूटिंग सुरू करण्यास सांगितले. लॉरिस कॅलिअरीने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये असे दिसते आहे की मुलगा डोंगरावरुन खाली येत आहे. त्याच वेळी, अस्वल मागे दिसत आहे, अस्वलही हळुहळु मुलाच्या दिशेनं येत आहे. मात्र या मुलानं संयम पाळत न घाबरता आपल्या आईच्या सुचनांचे पालन केले. आतापर्यंत घटनेचा हा व्हिडीओ 48 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच 200 हून अधिक लाईक्स आणि 56 री-ट्वीट झाला आहे. लोकांनी मुलाचे जोरदार कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ फेसबुकवरही खूप व्हायरल होत आहे. वाचा- जिराफासारख्या दिसणाऱ्या प्राण्याच्या ‘जंगल डेट’चा VIDEO व्हायरल

)







