नागपूर, 22 जून : गेल्या काही महिन्यांमध्ये अचानक हार्ट अटॅक मुळे मृत्यू झाल्याची प्रकरणांमुळे एकच खळबळ उडाली. अगदी चालता-बोलता, खाता-पिता, नाचताना तरुणांनाही हार्ट अटॅक आल्याने चिंता वाढली. पण आता तर असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यात नवजात बाळाला हार्ट अटॅक आला आहे. तोपण तब्बल 3 वेळा. नागपुरातील धक्कादायक प्रकरण. हार्ट अटॅक म्हटलं की पूर्वी वाढत्या वयातील आजार समजला जायचा. पण आता तरुणांना काय अगदी नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही हार्ट अटॅक आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. नागपुरात अवघ्या तीन महिन्यांच्या बाळाला तीन वेळा हार्ट अटॅक आल्याची घटना समोर आली आहे.
नागपूरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात या बाळाचा जन्म झाला. प्रेग्न्सीच्या नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला नव्हता. हे बाळ लवकर जन्माला आलं होतं. त्यामुळे त्याला एनआयसीयूमध्ये ठेवलं होतं. मुलाला श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. अजब प्रकरण! पुरुष झाला प्रेग्नंट; तब्बल 36 वर्षांच्या प्रेग्नन्सीनंतर दिला जुळ्यांना जन्म या बाळाला व्हायरल न्यूमोनिया होता. त्यामुळे त्याचं फुफ्फुस खराब झालं होतं. त्याला दोन आठवडे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. 90 दिवसांत या नवजात बालकाला तीन हृदयविकाराचे झटके आले. मात्र, तिन्ही प्रसंगी डॉक्टरांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत मुलाचे प्राण वाचवले. डॉक्टरांनी सांगितलं की, मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळांना ईच्या पोटात संसर्ग होतो. जन्मानंतरही त्यांना संसर्ग होण्याचा धोका खूप जास्त असतो. याबाबत जीएमटीएचचे डॉ.अभिषेक म्हणाले की, अशा परिस्थितीत मुलाला जास्त अँटिबायोटिक्स दिले जात नाहीत. त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन आठवडे ते व्हेंटिलेटरवर होते. त्याची सीएमव्ही चाचणी करायची होती पण ती रुग्णालयात उपलब्ध नव्हती. शिवाय अनेकांना ती परवडतही नाही. त्यामुळे नवजात बालकाच्या पालकांच्या संमतीने त्याला क्लेन्सिक्लोव्हिरचे इंजेक्शन देण्यात आले. 16 हजार हार्ट पेशंटला वाचवणाऱ्या डॉक्टरचा त्याच्याच हृदयाने केला ‘घात’; 41 व्या वयात हार्ट अटॅकने मृत्यू आता बाळ पूर्णपणे बरं असून त्याला उपचारानंतर डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आलं आहे.