Home /News /viral /

कुटुंबाने घरात पाळला भलामोठा कोळी; वर्षभरानंतर... पाहूनच सर्वांना फुटला घाम

कुटुंबाने घरात पाळला भलामोठा कोळी; वर्षभरानंतर... पाहूनच सर्वांना फुटला घाम

ज्या कोळ्याला आपण घरात ठेवतही नाही, त्या कोळ्याला या कुटुंबाने पाळीव प्राणी म्हणून घरात ठेवलं आहे.

    कॅनबेरा, 04 मे : बऱ्याच लोकांना प्राणी पाळण्याची आवड असते. कुणी कुत्रा पाळतं, कुणी मांजर पाळतं. पण एका कुटुंबाने असा प्राणी पाळला ज्याला पाहून सर्वांना धक्का बसला आहे. असा प्राणी पाळण्याचा कुणी स्वप्नातही विचार करणार नाही. गेल्या वर्षभरापासून हा जीव या कुटुंबाच्या घरात राहतो आहे (Man keep spider in home as pet). ऑस्ट्रेलियाच्या नॉर्थ क्वीन्सलँडमध्ये राहणारा जॅक ग्रे. ज्याने आपल्या घरातील पाळीव प्राण्याचा फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा प्राणी दुसरा तिसरा कुणी नाही तर चक्क एक कोळी आहे. एक मोठा कोळी. गेल्या वर्षभरापासून हा कोळी त्याच्या घरात राहतो. त्याचं नाव त्याने चार्लेट असं ठेवलं आहे. जॅकने सांगितलं,  गेल्या वर्षी त्याने पहिल्यांदा या कोळीला आपल्या घरात पाहिलं. तेव्हा तो खूप मोठा होता आणि आता त्यापेक्षा जास्त मोठा झाला आहे. इतक्या मोठ्या कोळ्याला पाहून कोणीही घाबरलं असतं, ओरडलं असतं. पण जॅकसोबत असं काहीच झालं नाही. त्याने त्याला घराबाहेरही काढलं नाही. एकदा त्याने त्या कोळ्याला घरातील पालीला खाताना पाहिलं. त्यानंतर त्याला आपल्या घरातच ठेवण्याचा निर्णय त्याने घेतला. हे वाचा - कसं शक्य आहे? माणसाने स्पर्श करताच 'मृत' झाला साप; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO हा कोळी हंट्समॅन प्रजातीचा कोळी आहे. जो सामान्यपणे सहा इंच इतक्या आकारापर्यंत असतो. पण या कोळीचा आकार त्यापेक्षाही मोठा आहे. जसे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तसे ते पाहून सर्वांना घाम फुटला. असा जीव कुणी घरात कसं काय पाळू शकतं, असाच प्रश्न बहुतेक नेटिझन्सनी विचारला आहे.  असा कोळी घरात ठेवल्याने अनेकांनी त्याच्यावर टिका केली. तो किती खतरनाक आहे ते सांगितलं. हा खरा कोळी असेल तर या तरुणाने आपलं घर पेटवून द्यावं, असा सल्लाही काही युझर्सनी दिला आहे. पण जॅकने चार्लेटपासून आपल्याला काही धोका आहे, हे नाकारलं. तो फक्त दिसायला भयानक आहे. आतापर्यंत त्याने कुणावरच हल्ला केला नाही. तो गप्पपणे घरातील एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात पळत राहतो, असं सांगितलं. हे वाचा - माकडाला त्रास देणं महिलेला भोवलं; प्राण्यानं केस ओढून मारहाण करत केली भयंकर अवस्था, VIDEO डेली स्टारच्या रिपोर्टनुसार हंट्समॅन स्पायडरबाबत अधिक माहिती देताना तज्ज्ञांनी सांगितलं, सामान्यपणे हे कोळी चावत नाहीत. फक्त बचावासाठी वेगाने पळतात.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Australia, Other animal, Viral, Viral news

    पुढील बातम्या