नवी दिल्ली, 11 एप्रिल : चहा आणि काही व्यक्तींचं खास नातं असतं. जगभरात असे अनेक चहाप्रेमी तुम्हाला सापडतील ज्यांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट चहापासून होतो. चहाप्रेमी तर कायम चर्चेत असतातच मात्र आजकाल चहा विक्रेतेही व्हायरल होत आहेत. चहा विकण्याच्या हटके अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधत आहे. सोशल मीडियावर चहा विक्रेत्यांचा अनोखा अंदाज कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. अशातच आणखी एका चहा विक्रेत्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. एक व्यक्ती चक्क ऑडी कारमध्ये चहा विकत आहे. हे ऐकून तुमच्याही भुवया उंचावल्या असतील. मात्र ही घटना खरी असून याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, रस्त्याच्या कडेला ऑडी लावून एक तरुण चहा विकत आहे. ऑडीमधून चहा विकताना पाहून सर्वच थक्क झाले आहेत. तरुणांना आकर्षित करण्यासाठी हा चांगला मार्केटिग फंडा या तरुणानं वापरलेला पहायला मिळत आहे. आलिशान कारमधून चहा विकणे हे या तरुणाचे अनोखे मार्केटिंग असल्याचं दिसतंय.
ashishtrivedii_24 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओवर भरपूर कमेंटदेखील येत आहेत. व्हिडिओला आता हजारो लाईक्स आणि हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडिया वापरकर्त्यांपैकी एकाने त्याला ‘ऑडी चायवाला’ म्हटलं. तर अनेक यूजर्सनी व्हिडिओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. काही वापरकर्त्यांनी सांगितले की त्या व्यक्तीने ऑडी खरेदी केली आणि आता कारचा ईएमआय भरण्यासाठी चहा विकत आहे. तर इतर वापरकर्त्यांनी कमेंट केली कारचा मालक ऑडीचा चहा विकून मर्सिडीज-बेंझ जी वॅगन खरेदी करण्याचा विचार करत आहे. त्याचवेळी, आणखी एकाने लिहिले व्यक्तीने चहा विकून कार खरेदी केली आहे की कार खरेदी करुन आता चहा विकतोय.