मुंबई,30 जून- तुम्ही कधी बोटीत बसला असाल तर बोट राईडच्यावेळी (Boat Ride) किती मजा येते हे तुम्हाला माहिती असेल. नदी किंवा समुद्रात (Sea) बोट चालवण्याचा आनंदच वेगळा असतो. तशी मजा आणि आनंद रस्त्यावर चालणाऱ्या गाडीत (Car) बसून रोज जरी फिरलं तरी मिळत नाही; पण जर कारनेसुद्धा बोटीप्रमाणेच फील द्यायला सुरुवात केली तर? कसं वाटेल याची कल्पना करा. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? बोटीसारखी गाडी कशी पाण्यावर तरंगू शकते? ही गोष्ट खरी ठरत आहे. आजकाल सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये एक कार बोटीसारखी पाण्यावर तरंगताना (Car Floats Like Boat) दिसत आहे.
जीप बोट (Jeep Boat) नावाच्या फेसबुक पेजवरील एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक जीप अचानक बोटीत रुपांतरित होताना दिसत आहे (Jeep Boat Viral Video). तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की जेव्हा पूर किंवा जास्त पाण्यात गाड्या अडकतात तेव्हा त्या चालत नाहीत. नंतर त्यांना ढकलून बाहेर काढावं लागतं. मात्र, या व्हिडिओमध्ये दिसणारी गाडी एका स्टीमर बोटीप्रमाणे वेगात तरंगताना दिसत आहे.
पाण्यात उतरताच बोटीसारखी तरंगू लागली गाडी-
व्हिडिओमध्ये एक कार जमिनीवरून पाण्यात जाताना दिसत आहे. ही कार पाण्यात गेल्यानंतर एकतर बुडेल (Drown) किंवा बंद पडेल, असे प्रथमदर्शनी वाटते. परंतु, ही कार अचानक पाण्यावर तरंगू लागते. जेव्हा तिचं इंजिन सुरू होतं तेव्हा ती स्पीड बोटीप्रमाणे (Speed Boat) वेगाने पाण्यातून फिरू लागते. शिवाय गाडीच्या मागे स्पीडबोटीप्रमाणे पाण्याची पांढरी रेषाही तयार होत असल्याचं दिसतं.
**(हे वाचा:** VIDEO - पाण्यात बोट चालवत होती व्यक्ती, काही क्षणातच मगरीच्या जबड्यात गेली; थरकाप उडवणारं दृश्य कॅमेऱ्यात कैद )
व्हिडिओवर लोकांनी दिल्या प्रतिक्रिया-
हा व्हिडिओ फेसबुकवर प्रचंड व्हायरल झाला असून, अनेकांनी लाईक (Like) केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 107 दशलक्ष व्ह्यूज (Views) मिळाले आहेत. तर, 24 लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. एक लाखांहून अधिक लोकांनी कमेंट करून आपला प्रतिक्रिया दिली आहे. ‘आफ्रिकेतील पूर (Floods of Africa) परिस्थितीचा सामना करण्यासाठी अशाच प्रकारचा शोध लावण्याची गरज आहे’, अशी एका व्यक्तीने कमेंट केली आहे. तर आणखी एकाने युजरने म्हटलं आहे की, “अशा वाहनांना धुण्याची गरजच पडणार नाही.” ‘हे वाहन घेतल्यानंतर दर महिन्याला मरिन मेकॅनिकची (Marine Mechanic) गरज पडेल,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.