जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - पाण्यात बोट चालवत होती व्यक्ती, काही क्षणातच मगरीच्या जबड्यात गेली; थरकाप उडवणारं दृश्य कॅमेऱ्यात कैद

VIDEO - पाण्यात बोट चालवत होती व्यक्ती, काही क्षणातच मगरीच्या जबड्यात गेली; थरकाप उडवणारं दृश्य कॅमेऱ्यात कैद

VIDEO - पाण्यात बोट चालवत होती व्यक्ती, काही क्षणातच मगरीच्या जबड्यात गेली; थरकाप उडवणारं दृश्य कॅमेऱ्यात कैद

व्यक्ती बोट चालवत असताना मगरीने केलेल्या भयंकर हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 29 जून : पावसाळ्यात बाहेर साचलेल्या पाण्यात तुम्ही कागदाच्या बोटी चालवण्याचा आनंद नक्कीच लुटला असेल. आता तर रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्याही बोटी मिळतात. एक व्यक्ती अशीच रिमोट कंट्रोलवर चालणारी बोट पाण्यात चालवत होती. इतक्यात एक मगर पाण्यातून बाहेर आली आणि भयंकर हल्ला केला. मगरीने केलेल्या शिकारीचं हे भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे (Crocodile attack video). मगरीच्या हल्ल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल, हदयाची धडधड वाढेल, काळजाचा ठोका चुकेल. व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती तलावाच्या किनाऱ्यावर उभी आहे. पाण्यात एक बोट आहे. व्यक्तीच्या हातात रिमोट आहे. व्यक्ती रिमोटवर चालणारी ही बोट पाण्यात चालवत आहे. इतक्यात एका मगरीचं लक्ष तिथं जातं. ती पाण्यातून वेगाने येते. पाण्यात असलेल्या बोटीच्या दिशेने मगर येते आणि आपला जबडा उघडून त्या बोटीला आपल्या जबड्यात घेते.  हा एखादा जीव असावा असं तिला वाटतं म्हणून ती त्या बोटीची शिकार करते (Crocodile eat remote control boat in water video).

जाहिरात

व्हायरल हॉग इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ अमेरिकेच्या फ्लोरिडातील आहे. हे वाचा -  गाढ झोपलेल्या चिमुकलीवर चढला अजगर आणि…; अंगावर काटा आणणारा VIDEO हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने जर त्या तलावात मगर असल्याचं माहिती होतं, तर ते इतके जवळ का उभे होते असं विचारलं आहे. तर एका युझरने प्लास्टिक बोट खाऊन मगरीला तर धोका पोहोचणार नाही ना, अशी चिंता व्यक्त केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात