जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रागाने केला घात! सामान फेकता फेकता स्वतःही बाल्कनीतून खाली कोसळला; Shocking Video

रागाने केला घात! सामान फेकता फेकता स्वतःही बाल्कनीतून खाली कोसळला; Shocking Video

सामानासोबत बाल्कनीतून कोसळली व्यक्ती.

सामानासोबत बाल्कनीतून कोसळली व्यक्ती.

रागात बाल्कनीतून सामान खाली फेकताना व्यक्तीसोबत घडली भयंकर दुर्घटना.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 ऑगस्ट : राग हा खतरनाक असल्याचं म्हटलं जातं. रागात कोण कधी काय करेल सांगू शकत नाही. राग आल्यानंतर व्यक्ती विचार करत नाही आणि रागाच्या भरात काहीही करते. कोणतंही धक्कादायक पाऊल उचलू शकते. रागाचा परिणाम फक्त समोरच्यालाच नव्हे तर राग राग करणाऱ्या व्यक्तीवरही होतो. असाच एक भयंकर व्हिडीओ समोर आला आहे. रागाने सामान फेकताना एक व्यक्ती स्वतःही बाल्कनीतून खाली कोसळली आहे. राग आल्यानंतर काही लोक खूप बडबड करत राहतात, काही लोक वस्तूंची आदळाआपट करतात तर काही लोक वस्तू फेकूनही देतात. या व्हिडीतील व्यक्तीही रागात अशीच वस्तू फेकते. पण यामुळेच त्याच्यासोबत भयंकर दुर्घटना होते. व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती बाल्कनीत आहे. ती रागात असून कुणाशी तरी भांडताना दिसते आहे. बिल्डिंगखाली असलेल्या व्यक्तीसोबत ती भांडते आहे. त्या व्यक्तीला इतका राग आला की ती घरात जाते आणि हातातून काही वस्तू घेऊन बाहेर येते. ते सामान ती बाल्कनीतून खाली फेकते. सामान खाली गेल्यानंतर या व्यक्तीचाही तोल जातो आणि सामानासोबत ही व्यक्तीही बाल्कनीतून खाली कोसळते. हे वाचा -  शक्ती नाही युक्तीचा केला वापर! कारचालकाने सशस्त्र दरोडेखोरांना क्षणात पळवून लावलं; पाहा VIDEO या व्यक्तीसोबत पुढे काय झालं ते या व्हिडीओत दिसत नाही आहे. या व्यक्तीला नक्कीच गंभीर दुखापत झाली असावी. The Darwin Awards नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

जाहिरात

फक्त 11 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तसा हा व्हिडीओ धक्कादायक असला तरी मजेशीरही आहे. त्यावर काही युझर्सनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. हे वाचा -  Reduce Anger: सतत चिडचिड-रागावणे आरोग्यासाठी आहे घातक; हे उपाय करून बघा परिणाम रागाचा कसा परिणाम होतो हे तुम्ही या व्हिडीओतून पाहिलंच. त्यामुळे तुम्हीही तुमचा राग इतका आऊट ऑफ कंट्रोल जाऊ देऊ नका की जी वेळ या व्यक्तीवर ओढावली ती तुमच्यावरही येईल. राग आला तर नेमकं काय करायचं, तो कसा नियंत्रणात ठेवायचा ते पाहुयात. 1) जेव्हा एखाद्या प्रसंगी तुम्ही खूप रागावता तेव्हा 10 पासून उलट आकडे मनातल्या मनात मोजावेत. यामुळे तुमचं लक्ष विचलित होऊन मन शांत होईल. 2) एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला सातत्यानं राग येत असेल किंवा तुमची चिडचिड होत असेल, तर अशा वेळी दीर्घ श्वास घ्यावा. 3) मनशांतीसाठी एखादं सुंदर छायाचित्र किंवा निसर्गचित्र पाहावं. एखादं सुमधुर गाणं ऐकावं. या गोष्टी राग नियंत्रणासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतात. 4) तुम्हाला सातत्यानं राग येत असेल तर तुम्हाला मेडिटेशनची गरज आहे, असं समजावं आणि शक्य तितक्या लवकर मेडिटेशन (Meditation) सुरू करावं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात