नवी दिल्ली 20 जून : सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण काहीच व्हिडिओ असे असतात, की ते वापरकर्त्यांना पुन्हा पुन्हा बघायला आवडतात. सोशल प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पाहिलेले व्हिडिओ प्राण्यांचे आहेत. कारण कधी-कधी प्राणी अशी गोंडस आणि लक्ष वेधणारी कृत्ये करतात, ज्याला पाहून माणसाचंही मन प्रसन्न होतं. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका मांजरीने आपल्या पिल्लाला समज देण्यासाठी आईचं आवडीचं चापट मारण्याचं प्रसिद्ध शस्त्र वापरलं आहे. Viral Video : घोड्यासोबत नको ते कृत्य करणं भोवलं; प्राण्याने अशी लाथ मारली की थेट उडूनच पडला खरंतर मांजरीचं पिल्लू कुठेतरी हरवलं होतं. ती त्याला सगळीकडे शोधत होती. सर्व ठिकाणी शोधाशोध केली तेव्हा एका ठिकाणी तिला तिचं पिल्लू सापडलं. आपल्या पिल्लाला बघून मांजरीच्या जीवात जीव आला. सुरुवातीला तिने आपल्या पिल्लाला रागात पाहिलं. रागाच्या भरात तिने त्याला पंजाने मारलंही. यानंतर त्याला आपल्या जबड्याच पकडून तिथून उचलून नेलं. हा व्हिडिओ पाहून हे जाणवतं की, आईइतकं कोमल ह्रदय कोणाचंच नसतं. ती आपल्या पिल्लाला रागवू शकते, मारू शकते, परंतु ती त्याच्यावर मनापासून प्रेम करते.
बिल्ली का बच्चा गुम हो गया था, जब मिला तो पहले डांटा
— Noor_Alam_Talha (@noor_alam22) June 18, 2023
फिर थप्पड़ रसीद किया और पकड़कर घर ले गई 😅
माँ तो मां होती है हर रंग व नस्ल में एक जैसी 😛♥️♥️♥️ pic.twitter.com/JOFMNvWmRv
हा व्हिडिओ एका ट्विटर युजरने पोस्ट केला आहे. आतापर्यंत 3 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. युजर्सनी मांजर आणि तिच्या पिल्लाच्या या क्यूट व्हिडिओचं कौतुकही केलं आहे. एका यूजरने म्हटलं की, ‘आई अशीच असते. आधी रागवते. मग मारते आणि मग तिच जखमांवर मलमही लावते, तेही मोठ्या प्रेमाने. तर आणखी एका युजरने म्हटलं की, ‘लहानपणी आम्हालाही असंच शोधलं जायचं आणि मारहाण करून घरी नेलं जात होतं. आणखी एका युजरने लिहिलं की, ‘तणावातून बाहेर पडण्यासाठी सर्वोत्तम व्हिडिओ’. एका व्यक्तीने लिहिलं की, ‘ही नक्कीच 90 दशकातील आई असेल’.