नवी दिल्ली 01 जुलै : लग्नातील नवरी आणि नवरदेवाचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. यात बहुतेकदा त्यांचं प्रेम किंवा डान्स पाहायला मिळतो. मात्र, आता एका लग्नातील एक अजब व्हिडिओ समोर आला आहे. कारण यात एका नवरीचा राग पाहायला मिळतो. नवरीने लग्नाच्या मंडपातच असं काही केलं, जे पाहून तिथे उपस्थित पाहुणेही हैराण झाले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवरदेव नवरीला आपल्या हाताने मिठाई खाऊ घालत असतो. मात्र नवरीला इतका राग आला की तिने नवरदेवाच्या हातातील रसगुल्ला घेतला आणि थेट फेकून दिला. रागीट नवरीबाईचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू-वर स्टेजवर उभे आहेत. दोघांनी हार घातला आहे, याचा अर्थ हा व्हिडिओ वरमालेच्या सोहळ्यानंतरचा आहे. लग्नाचे विधी सुरू असताना नवरदेवाचा चेहरा पाहताच हादरली नवरी; पोलिसांत पोहोचलं प्रकरण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरदेव नवरीलाला रसगुल्ला खाऊ घालण्यासाठी पुढे येतो पण नवरी मिठाई खाण्यास नकार देते. यानंतर नववधूला राग अनावर होतो. संतापलेली नववधू रसगुल्ला हातात घेऊन तो लोकांसमोर फेकून देते. यानंतर ती नवरदेवाला ग्लासमध्ये पाणी देते मात्र नवरदेव हे पाणी पिण्यास नकार देतो. मग नवरीचा पारा आणखीच चढतो आणि ती हा ग्लासही फेकून देते.
Kalesh B/w Groom and Bride on Stage pic.twitter.com/Rn28WyHF3G
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 28, 2023
ट्विटरवर @gharkekalesh नावाच्या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. युजरने व्हिडिओ शेअर करत लिहिलं की, वधू-वर स्टेजवर उभे होते आणि मग असं काही झालं. एका दिवसापूर्वी अपलोड केलेला हा व्हिडिओ 1 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर नववधूच्या वागण्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट केली, यांचा तर लग्नाच्या आधीच घटस्फोट झाला. दुसऱ्याचं म्हणणं आहे, की हे लग्न नक्कीच मुलीच्या इच्छेविरुद्ध होत आहे. म्हणूनच ती इतकी भडकली आहे. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.