कुर्मग्राम(आंध्रप्रदेश) 03 जानेवारी : आजच्या काळात वीज, गॅस, मोबाईल आणि इंटरनेटशिवाय जगण्याचा विचार कोणीही करू शकत नाही. पण आंध्र प्रदेशात एक गाव आहे जिथे लोक चुलीवर अन्न शिजवतात, विजेशिवाय राहतात, इंटरनेट आणि मोबाईलशिवाय आनंदाने जगत आहेत. तुम्हाला वाटेल की कदाचित या गावातील लोक खूप गरीब असतील, पण तसे अजिबात नाही. या सर्व गोष्टींचा त्यांनी स्वतःच्या इच्छेने त्याग केला आणि या सर्व भौतिक गोष्टींशिवाय ते वैदिक काळात लोक जगत होते तसे जीवन जगत आहेत.
कुर्मग्राम असे या अनोख्या गावाचे नाव आहे, ते आंध्र प्रदेशातील IT हब असलेल्या श्रीकाकुलम जिल्ह्यात आहे. 14 कुटुंबे आणि इतर काही लोक येथे राहतात. ते शेती करून फळे, भाजीपाला आणि धान्य पिकवतात. हे अन्न ते गॅसवर न शिजवता चुलीवर शिजवून खातात. या गावातील सर्वच लोक कृष्णाचे भक्त आहेत. त्यांनी आपले जीवन त्यांच्या सेवेसाठी समर्पित केले आहे.
हे ही वाचा : आरतीचं ताट ओवाळताना अनेकजण करतात या चुका; पूजा-विधीचं मिळत नाही इच्छित फळ
साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा मार्ग अवलंबण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. त्यांची घरे मातीची आहेत. ते स्वतःचे कपडेही शिवतात. श्रीकृष्णाप्रमाणेच ते गोपालक आहेत आणि त्यांच्याकडून मिळणारे दूध-शेण वापरतात.
या गावातील लोक डिजिटल उपकरणे किंवा यंत्रांशी कसलाच वापर करत नाहीत. गावात एकच लँडलाइन फोन आहे जो केवळ आपत्कालीन किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी वापरला जातो. येथे एक गुरुकुल देखील आहे जिथे विद्यार्थ्यांना वेद, शास्त्र इत्यादी शिकवले जातात. मुलांसमोर 3 पर्याय आहेत: भक्तीवृक्ष, भक्तीशास्त्री आणि भक्तिवैभव. या तीन अभ्यासक्रमांचा अभ्यास करण्यासाठी सुमारे 10 वर्षे लागतात. यानंतर, विद्यार्थी एकतर पुढील शिक्षण घेऊ शकतो किंवा नोकरी मिळवू शकतो असे पर्याय या गावात उपलब्ध करण्यात आले आहेत.
मुलांना गणित, विज्ञान, संस्कृत, तेलगू, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, कला आणि नैतिक शिक्षणही दिले जाते. येथील लोक पहाटे साडेतीन वाजता उठतात. गावकरी तंदुरुस्त राहण्यासाठी पोहणे, कबड्डी, यासारखे खेळही येथे दिले जातात. हे गाव आता एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनले आहे. दर आठवड्याला हजारो लोक येथे भेट देण्यासाठी येतात.
हे ही वाचा : धन टिकवून ठेवायचं असेल तर काय करावं? वाचा गरुड पुराणातील नियम
कुर्मग्राममध्ये काही परदेशी लोकही राहतात, जे कृष्णाचे भक्त आहेत. येथील गुरुकुलाचे प्रमुख नटेश्वर नरोत्तम दास सांगतात की भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेल्या गोष्टींवर ते आपले जीवन जगतात. असे अनेक लोक आहेत जे आपल्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून कृष्णाचे भक्त म्हणून येथे येत आहेत.