नवी दिल्ली, 3 जानेवारी : सनातन हिंदू धर्मात गरुड पुराणाला महापुराण मानलं गेलं आहे. यात भगवान विष्णू आणि त्यांचं वाहन गरुड यांच्यातील संवाद आहे ज्यात जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या विविध स्थितींचं वर्णन आहे. गरुड पुराणात व्यक्तीच्या जन्म-मृत्यूदरम्यान केलेल्या कर्मांविषयी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्याचे पालन केल्याने माणूस आपलं जीवन यशस्वी होऊ शकतो. यासोबतच जीवन पूर्णपणे जगण्याचा आणि योग्य मार्गावर चालण्याचा मार्गही सांगण्यात आला आहे. गरुड पुराणात पैसे कमावण्याचा आणि खर्च करण्याचाही उल्लेख आहे. गरुड पुराणानुसार पैशाचा चुकीचा वापर श्रीमंत माणसालाही गरीब बनवू शकतो. पैशाशी संबंधित गरुड पुराणातील खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. या संदर्भात ‘अमर उजाला’ने वृत्त दिलंय. पैशांचा चांगला वापर अशाप्रकारे करा - गरुड पुराणानुसार, माणसाकडे कितीही संपत्ती असली, तरी तो आपल्या कुटुंबाला सुखी जीवन देऊ शकत नसेल तर अशी संपत्ती व्यर्थ आहे. - हिंदू धर्मात महिलांना लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि स्त्रीचा अपमान करणं म्हणजे लक्ष्मीचा अपमान आहे. गरुड पुराणानुसार घरातील महिलांचं रक्षण करू शकत नसेल ते धन लवकर नष्ट होतं. तसंच अशा ठिकाणी माता लक्ष्मी कधीही वास करत नाही. त्यामुळे धन असेल आणि ते टिकवून ठेवायचं असेल तर महिलांचा आदर सम्मान करायला हवा. हेही वाचा - आरतीचं ताट ओवाळताना अनेकजण करतात या चुका; पूजा-विधीचं मिळत नाही इच्छित फळ - गरुड पुराणात असंही सांगितलं आहे की, जी संपत्ती गरीबांच्या मदतीसाठी वापरली जात नाही, जी पुण्य दानात खर्च केली जात नाही, ती लवकर नष्ट होते. पैशाचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा त्याचा उपयोग गरजूंना मदत करण्यासाठी होतो, असं गरुड पुराणात म्हटलं गेलंय. - जे लोक इतरांची संपत्ती किंवा पैसा बळकावून घेण्याचा विचार करतात, त्यांच्यावर माता लक्ष्मी सतत नाराज होते. त्यामुळे त्यांना जीवनात खरा आनंद कधीच मिळत नाही.
गरुड पुराणानुसार माणसाजवळ अमाप धन असेल, पण त्याचा योग्य वापर केला जात नसेल, तर ते व्यर्थ आहे. असलेलं धन टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यात भर पडावी, यासाठी त्या धनाचा योग्य वापर होणं आवश्यक आहे. घरातील महिलांचा सन्मान करून, गरजूंना दान करून तुम्ही लक्ष्मी मातेचे आशीर्वाद घेऊ शकता. लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न असेल तर तुमच्या संपत्तीत वाढ होत जाईल. त्यामुळे ती नाराज होईल, अशा कृती माणसाने करू नयेत.