नवी दिल्ली, 27 डिसेंबर : आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. आनंद यांनी ट्विटरवर ट्विट केले व्हिडीओ किंवा फोटो हे एका क्षणात व्हायरल होतात. यावेळी आनंद महिंद्रा यांनी एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक मनुष्य बोलू शकत नव्हता, मात्र तरी तो मोबाईलवर व्हिडिओ चॅटवर करताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल की मोबाइल आपल्या जीवनात एक मोठा भाग झाला आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की ती व्यक्ती मिठाईच्या दुकानाच्या बाजूला बसून मोबाइलवर व्हिडिओ चॅटद्वारे हातवारे करत बोलत आहे. व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी, “आपण बर्याचदा मोबाईलवर टीका करतो. आपण म्हणतो की मोबाइलने आपले आयुष्य बिघडवले आहे, ताब्यात घेतले आहे. परंतु आपल्याला हे कळले पाहिजे की या उपकरणांनी आपल्यातील बर्याच जणांसाठी संवादाचे क्षण दिले आहेत’’, असे कॅप्शन लिहिले आहे. वाचा- 32 कोटींची लॉटरी लागल्यानंतर लाईव्ह कार्यक्रमातच पत्रकारानं दिला राजीनामा आणि…
We often criticise the way in which mobile devices have taken over our world.. It’s good to remind ourselves that these devices have also OPENED up a whole new world of communication for many of us... pic.twitter.com/kricI2dNeG
— anand mahindra (@anandmahindra) December 27, 2019
वाचा- JCB, पाकचा चाहता ते पॅराग्लायडिंगवाला VIDEO; 2019मध्ये या ट्रेंडने जोरात हसवलं आनंद महिंद्रा यांनी 27 डिसेंबर रोजी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 3 हजाराहून अधिक लाईक्स आणि 700 हून अधिक री-ट्वीट मिळाली आहेत. लोक या व्हिडिओचे खूप कौतुक करीत आहेत. वाचा- VIDEO : शिकार करण्यासाठी वाघानं चिमुरड्यावर घातली झडप आणि… एका युझरने यावर लिहिले आहे की, “जसजसा आपला देश प्रगती करीत आहे तसतसे नवीन तंत्रज्ञान येत आहे. नवीन गॅझेट्स तयार केली जात आहेत. काहीतरी नवीन घडत आहे. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आपण त्याचा फायदा घेत असाल की नुकसान आपल्यावर अवलंबून आहे. व्हिडीओ कॉल्सद्वारे शक्य नव्हते अशा व्हिडीओ कॉलचा त्याने चांगला वापर केला”.