नवी दिल्ली, 30 जानेवारी: प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिद्रा (Anand Mahindra) यांनी थार गाडीच्या (Thar Car) जाहीरातीचा (Advertisement) एक भन्नाट व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Socail Media) शेअर केला आहे. डेअरिंग, थरार आणि प्रेम यांचा संदेश देणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. प्रेमी युगुलाची एकमेकांशी होणारी भेट या व्हिडिओत हायलाईट करण्यात आली आहे.
थार। नामुमकिन की जानकारी नहीं.. pic.twitter.com/wcR2Icl5UZ
— anand mahindra (@anandmahindra) January 29, 2022
‘थार’चा थरार हा व्हिडिओ एका कारच्या जाहीरातीचा आहे. या जाहीरातीत एक तरुण आणि तरुणी दोन वेगवेगळ्या कारमधून चाललेले दिसतात. कधी तरुणाची कार पुढे जाते तर कधी तरुणीची कार त्याला ओव्हरटेक करताना दिसते. बॅकग्राऊंडला ‘मेर सपनोंकी रानी कब आएगी तू’, हे गाणं ऐकू येतं. तरुण आणि तरुणी दोघंही एकमेकांना आधीपासूनच ओळखत असल्याचं व्हिडिओत काही क्षणांनी लक्षात येतं. तरुणाने केलं प्रपोज एका वळणावर तरुण आणि तरुणी यांच्या गाड्या एकमेकांसमोर येतात आणि करकचून ब्रेक दाबून जागीच थांबतात. गाडीतून तरूण उतरतो आणि तरुणीकडे चालत येतो. त्याच्या हातात एंगेजमेंट रिंग असल्याचं दिसतं. तरुण तरुणीजवळ येतो आणि गुडघ्यावर बसत तिला प्रपोज करतो. त्यानंतर तरुणी त्याचा प्रस्ताव हसत हसत स्विकारते. तरुणी म्हणते, यू आर इंपॉसिबल. त्यावर तरुण विचारतो, इंपॉसिबल क्या होता है..? हे वाचा- Corona विरोधात आंदोलन पेटलं, पंतप्रधानांच्या निवासस्थानाला आंदोलकांचा वेढा महिंद्रांकडून प्रमोशन आपल्या कंपनीच्या या कारचं प्रमोशन करणारा व्हिडिओ आनंद महिंद्रांनी शेअर केला आहे. आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावरून वेगवेगळे व्हिडिओ नेहमीच शेअर करत असतात. विशेषतः तरुणांनी केलेले वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग, वैज्ञानिक शोध, काही जुगाड असं काहीबाही ते सतत शेअर करत असतात. त्यामुळे महिंद्रांच्या सोशल मीडियाकडे अनेकांचं लक्ष असतं. सध्या थार गाडीची ही अनोखी जाहीरात शेअर करत त्यांनी प्रमोशन आणि मनोरंजन अशी दुहेरी संधी साधल्याची चर्चा आहे.