मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Corona विरोधात आंदोलन पेटलं, पंतप्रधानांच्या निवासस्थानाला आंदोलकांचा वेढा; ट्रूडो यांनी सोडलं घर

Corona विरोधात आंदोलन पेटलं, पंतप्रधानांच्या निवासस्थानाला आंदोलकांचा वेढा; ट्रूडो यांनी सोडलं घर

आंदोलकांनी त्यांच्या निवासस्थानाला घेराव घातला आहे. राजधानी ओटावा येथे हजारो ट्रक चालक आणि इतर आंदोलक जमले आहेत. त्यांनी पंतप्रधान ट्रुडो यांच्या निवासस्थानाला वेढा घातला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

कॅनडा, 30 जानेवारी: कॅनडाचे (Canada) पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) कोरोना मार्गदर्शक तत्त्वे कडक करण्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात विरोध पाहता कुटुंबासह गुप्त ठिकाणी गेले आहेत. आंदोलकांनी त्यांच्या निवासस्थानाला घेराव घातला आहे. राजधानी ओटावा येथे हजारो ट्रक चालक आणि इतर आंदोलक जमले आहेत. त्यांनी पंतप्रधान ट्रुडो यांच्या निवासस्थानाला वेढा घातला आहे.

ट्रक चालक देशात कोरोनाची लस अनिवार्य करण्याच्या आणि लॉकडाऊन लादण्याच्या विरोधात आहेत. त्यांनी आपल्या 70 किमी लांबीच्या काफिल्याला 'फ्रीडम कान्वॉइ' असे नाव दिलं आहे.

वडिलांकडून अपहरणाची तक्रार; मुलीनं FB वर लिहिलं ''GOT MARRIED'',काय झालं नेमकं 

कॅनडाची राजधानी ओटावामध्ये शनिवारी हजारो लोकांनी लसीकरण अनिवार्य करण्याविरोधात आणि कोविड-19 निर्बंधांविरोधात निदर्शनं केली. यादरम्यान काही आंदोलकांनी कोविड निर्बंधांची तुलना फॅसिझमशी केली आणि कॅनडाच्या ध्वजासह नाझी चिन्हे प्रदर्शित केली. अनेक आंदोलकांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर जोरदार टीका केली आणि त्यांना लक्ष्य केले.

सक्तीच्या लसीकरणाला विरोध

मॉन्ट्रियल येथील डेव्हिड सँटोस म्हणाले की, लसीकरण अनिवार्य करणे ही आरोग्याशी संबंधित नसून "गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याची" सरकारची युक्ती असल्याचं त्यांना वाटते. निषेधाच्या आयोजकांनी सर्व COVID-19 निर्बंध आणि लसीकरण अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेण्याची आणि पंतप्रधान ट्रूडो यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली.

अफगाणिस्तानात अडकली गर्भवती महिला पत्रकार, तिच्याच देशानं नाकारला प्रवेश; आता तालिबानकडेच मागितली मदत

यापूर्वी, पीएम ट्रूडो म्हणाले होते की, ट्रकचालक विज्ञानविरोधी आहेत आणि ते केवळ स्वतःसाठीच नाही तर इतर कॅनेडियन लोकांसाठी धोका निर्माण करतात. 50 हजार ट्रक चालकांनी त्यांच्या 20 हजार ट्रकसह राजधानी ओटावा येथे असलेल्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाला वेढा घातला असल्याचे सांगण्यात येत आहे.

राजधानीत 10 हजार आंदोलक

सुमारे 10 हजार लोक या आंदोलनात सामील आहेत जे संसदेच्या आवारात घुसले. मात्र, पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन पोलीस अतिदक्षतेवर आहेत. सुमारे 10 हजार लोक संसदेत पोहोचल्याचे पोलिसांनी सांगितलं. मात्र संसद परिसरात किती आंदोलक उपस्थित आहेत याचा नेमका आकडा पोलिसांकडे नाही.

First published:

Tags: Canada