जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आनंद महिंद्रा सोशल मीडियावर म्हणाले, 'वाचवा'; असं काय घडलं? पाहा VIDEO

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर म्हणाले, 'वाचवा'; असं काय घडलं? पाहा VIDEO

आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर केलेली ही पोस्ट तुफान व्हायरल होते आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 07 एप्रिल : उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह असतात. आपल्या ट्विटर अकाऊंटवर ते किती तरी वेगवेगळे व्हिडीओ पोस्ट करत असतात. सध्या त्यांनी पोस्ट केलेला असाच एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये वाचवा असं म्हटलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. असं नेमकं काय घडलं आहे? ते पाहुयात. आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ खरंतर एका माकडा चा आहे. एका महिलेसोबत हे माकड आहे. महिला बेडवर झोपली आहे आणि माकड बेडवर तिच्याशेजारी बसलं आहे. माकडाच्या हातात मोबाईल फोन दिसतो आहे. महिला माकडावर इतकं प्रेम करते की तिने आपला मोबाईल त्या माकडाला दिला आहे आणि माकडही ते मोठ्या उत्सुकतेने वापरतं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

आता सामान्यपणे कुणीही हा व्हिडीओ पाहिला तर मोबाईल वापरणाऱ्या या माकडाचं कौतुक वाटेल आणि आपल्या मुलांप्रमाणे माकडाच्या हातात मोबाईल देणाऱ्या महिलेच्या प्रेमाचंही. पण आनंद महिंद्रा यांनी माकडाच्या हातात मोबाईल पाहून चिंता वाटू लागली आहे. धडावेगळं झालं सापाचं डोकं, मृत म्हणून व्यक्तीने शेपटी धरताच…; थरकाप उडवणारा VIDEO या बिच्चाऱ्याला अशा माणुसकीपासून वाचवा असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

जाहिरात

माकडांच्या हातातील मोबाईलचे याआधीही असे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एका मंत्र्यानेही माकडाचा असा एक व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यात जंगलात एका व्यक्तीने माकडांना मोबाईल दाखवला आणि माकड तो मोबाईल वापरताना दिसले. तर एका व्हिडीओमध्ये एका लहान मुलाच्या हातातील मोबाईल एका माकडाने हिसकावून घेतला. तर एक प्रकरण तर असं होतं, ज्यात एका माकडाने तरुणाचा मोबाईल फोन पळवला आणि चक्क त्यामध्ये आपले सेल्फी काढले. पर्यटकांवर दगडफेक करत होतं माकडाचं पिल्लू; आईने असा शिकवला धडा,­ Video पाहून व्हाल अवाक माकड असो वा कोणताही प्राणी त्यांना असं मोबाईलचं व्यसन किंवा वेड लावणं कितपत योग्य आहे? तुम्हाला हे असं प्राणीप्रेम पटतंय का? यावरील तुमचं मत आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात