मुंबई, 25 ऑगस्ट : कित्येकांना समोर साधं छोटंस गांडुळ जरी दिसलं तरी भीती वाटते. साप (Snake video) दिसला तर घामच फुटतो. मग विचार करा. भलामोठा अॅनाकोंडा (Anaconda) दिसला तर काय होईल? आपला अर्धा जीव असाच जाईल नाही का? असंच धडकी भरवणारं दृश्य समोर आलं आहे. ज्यात चक्क रस्त्यावर अॅनाकोंडा (Anaconda Video) दिसला आहे.
सामान्यपणे फिल्ममध्ये असे फिरणारे अॅनाकोंडा (Anaconda Snake Video) तुम्ही पाहिले असतील पण हा कोणता फिल्मी सीन नाही तर ही प्रत्यक्षात घडलेली घटना आहे. सोशल मीडियावर (Social Media) या अॅनाकोंडाचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे.
View this post on Instagram
व्हिडीओत पाहू शकता एक अॅनाकोंडा रस्ता ओलांडताना दिसत आहे. रस्त्याच्या एका बाजूने तो दुसऱ्या बाजूला जातो आहे. अगदी तो डिव्हायडरही ओलांडतो.
हे वाचा - भयंकर! मेल्यानंतर 20 मिनिटांनी नाग झाला जिवंत; शेफला दंश; वाचून अंगावर येईल काटा
त्याच्या आजूबाजूला काही लोकही दिसत आहेत, जे त्या अॅनाकोंडाला जाण्यासाठी रस्ता करून देत आहेत. म्हणजे हा एक हायवे आहे, तिथं बऱ्याच गाड्या जात आहेत. या गाड्यांना थांबवून अजगराला त्याचा मार्ग मोकळा करून दिला जात आहे. जेणेकरून तो सुरक्षितपणे आपल्या ठिकाणी जाईल. इतका मोठा साप पाहून गाडीचालकांनाही घाम फुटला. त्यांनी स्वतःच आपली गाडी थांबवली आणि आधी सापाला जाऊ दिलं.
हे वाचा - अद्भुत! रंग बदलणारा Octopus पाहिलात का? कॅमेऱ्यात कैद झाला निसर्गाचा चमत्कार
हळूहळू साप रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या झुडुंपामध्ये गेला आणि तो गायब झाला. हे दृश्यं ब्राझीलमधील असल्याचं सांगितलं जातं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Snake, Snake video, Viral, Viral videos